Sixteen villages including Lasalgaon Vinchoor facing water shortage Notice from Mahavitaran regarding overdue electricity bill  esakal
नाशिक

Nashik Water Crisis: लासलगाव विंचूरसह सोळा गावांवर पाणीटंचाईचे सावट! थकीत वीजबिलाबाबत महावितरणकडून नोटीस

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे सुमारे चार कोटी ७४ लक्ष रुपयाचे बिल थकल्याने महावितरणकडून १५ दिवसांत बिल भरावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस सोळा गाव पाणीपुरवठा समितीस दिली आहे.

त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर लासलगाव विंचूरसह सोळा गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. (Sixteen villages including Lasalgaon Vinchoor facing water shortage Notice from Mahavitaran regarding overdue electricity bill nashik)

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सोळा गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, योजनेच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ही योजना चालविण्यासाठी १६ गावांतील सदस्यांची समिती स्थापन केली आहे. लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर समितीचे अध्यक्ष आहे. या योजनेचे वीजबिल कमी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे.

सध्या वीजबिल मोठ्या प्रमाणात थकल्याने सौरऊर्जा प्रकल्पासाठी ‘महावितरण’कडून ‘ना-हरकत’ दाखला मिळत नसल्याने पुढील कामास ब्रेक लागला आहे.

विशेषतः या समितीकडे सर्व जबाबदारी सोपविली असताना, योग्य नियोजनाअभावी पाणी योजनेचे सुमारे ४ कोटी ७४ लक्ष वीजबिल थकले आहे.

सोळा गावे या योजनेवर अवलंबून आहेत. दिवाळीच्या तोंडावर सोळा गाव पाणीयोजनेची वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आल्याने लासलगाव विंचूरसह १६ गावातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो, असे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, सुवर्णाताई जगताप, संगीता पाटील, संतोष पलोड, अमोल थोरे, दत्ता पाटील, आश्विनी बर्डे, ज्योती निकम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT