girls birth rate google
नाशिक

नाशिकमध्ये मुलींच्या जन्मदरात किंचित घट

विक्रांत मते

नाशिक : पाच वर्षांच्या तुलनेत नाशिकमध्ये स्री जन्मदरात या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत घट झाल्याचे दिसून येत आहे. हजार मुलांमागे पहिल्या सहा महिन्यांत ९०२ मुलींचा जन्म झाल्याचे वैद्यकीय विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

स्त्री जन्मदरात वाढ व्हावी म्हणून शासनातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. विशेष म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ‘सुकन्या योजना’, ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘बेटी पढाओ-बेटी बचाओ’ यांसारख्या योजनांच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रवृत्त केले जाते. गर्भलिंग चाचणी केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाते. असे असले तरी मुलींच्या जन्मदरात या वर्षी घट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हजार मुलांमागे मुलींच्या जननदराचे प्रमाण असे-

२०१७ मध्ये ९०७ मुलींच्या जन्मदराचे प्रमाण होते. २०१८ मध्ये मुलींची संख्या ९२३ तर २०१९ मध्ये ९२० नोंदविली गेली. २०२० मध्ये ९१२ तर २०२१ मधील पहिल्या सहा महिन्यांतील प्रमाण ९०२ पर्यंत खाली आले आहे. अर्थात डिसेंबरअखेरच्या आकडेवारीवरून मुलींच्या जन्माचा वार्षिक टक्का घसरला की नाही, हे स्पष्ट होणार असले तरी पहिल्या सहा महिन्यांत मात्र टक्का घसरल्याचे स्पष्ट दिसून येते.

वर्षनिहाय स्री-पुरुष जन्म

वर्ष स्त्री पुरूष

२०१७ १०,६१९ ११,७०१

२०१८ १३,३७६ १४,४८२

२०१९ २०,२६४ २२,०२१

२०२० १९,५५३ २२,६७१

जून २०२१ ४,३६८ ४,८४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT