Cycle Track esakal
नाशिक

Smart City Companyकडून पुन्हा एकदा 2 Cycle track बनवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात सायकल ट्रॅक तयार झाल्यानंतर फक्त उद्‌घाटन पुरतेच ते अस्तित्वात असल्याचा अनुभव पाठीशी असताना आता स्मार्टसिटी कंपनीने पुन्हा एकदा दोन सायकल ट्रॅक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक स्तंभ ते जेहान सर्कल व पाइपलाइन रोड ते महिंद्रा सर्कल असे दोन्ही बाजूने १६ किलोमीटर लांबीचे पॉप-अप सायकल ट्रॅक बनवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी हे ट्रॅक बनविले जाणार आहे.

नाशिकला सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे यापूर्वी महापालिकेने मोठ्या प्रमाणात सायकल ट्रॅकची निर्मिती केली आहे. मात्र हे ट्रॅक सध्या धुळखात पडले आहे, तर त्र्यंबक रोडवरील सायकल ट्रॅकवर अतिक्रमणे व महापालिकेनेच वृक्षारोपण करून ट्रॅक अडविला आहे. स्मार्टसिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवरदेखील सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. (Smart City Company once again decided to make 2 Cycle track Nashik Latest Marathi News)

मात्र, त्याहून एकही सायकल जात नाही. परंतु वाहनांच्या पार्किंगसाठी त्या ट्रॅकचा उपयोग केला जात आहे. त्र्यंबक नाका सिग्नल ते जलतरण तलाव या दरम्यानदेखील सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, तेथेही खासगी वाहनांच्या पार्किंगसाठीच उपयोग होतो. सायकल ट्रॅकचा पूर्वीचा अनुभव चांगला नसताना आता स्मार्टसिटी कंपनीने केंद्र सरकारच्या सायकल फॉर चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी दोन पॉप-अप सायकल ट्रॅक बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रस्तावात अशोक स्तंभ ते ध्यान सर्कल व पाइपलाइन रोड ते महिंद्रा सर्कल असे १६ किलोमीटरचे दोन्ही बाजूचे ट्रॅक बनविले जाणार आहे. या ट्रॅकची गुरुवारी (ता. १३) चाचणी करण्यात आली. या वेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सायकल ट्रॅक वर येत असलेल्या अडथळ्यांची माहिती दिली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्तात्रेय चकोर व सदस्य जगन्नाथ पवार, रामदास सोनवणे, अमोल भांदुरे, उल्हास कुलकर्णी, अनिल राऊत, सतीश महाजन, संतोष चाकूरकर, तृप्ती दाकाटकर, यामिनी नटाळ, जगन्नाथ पवार, सुवर्णा कांगणे, शुभांगिनी भुजबळ, स्मार्टसिटीचे अधिकारी दुर्गेश ओझरकर, निखिल भोईर, सूरज सूर्यवंशी, माधुरी जावळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT