Nashik News : केंद्र सरकारच्या निधीतून गोदाघाटावर गत दोन वर्षांपासून विविध विकासकामे सुरू होती. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत.
मात्र अद्यापही अनेक कामे बाकी असून, ती पूर्ण होणार की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. (Smart project works stalled at Godaghat Increased wheel slippage due to tall deep sidewalls Nashik News)
गोदाघाटावर स्मार्टसिटी कंपनीकडून नदीच्या दुतर्फा टाइल्स लावण्यात आल्या आहेत. परंतु गाडगे महाराज पुलाच्या वरील बाजूसह रोकडोबा मंदिर परिसरातील काही भागात अद्यापही टाइल्स टाकण्यात आलेल्या नाही, त्यामुळे काही ठिकाणी उंचवटा, तर काही ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे.
त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. येथील गटारींवरील ढाप्यांमुळे हे काम रखडल्याचे सांगितले जात असलेतरी ढाप्याचे कामही पूर्ण झाले आहे.
खैरे गल्लीकडील भाग, तसेच दिल्ली दरवाजा परिसर उंच असल्याने सहाजिकच या भागातून येणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. खड्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे.
खंडेराव महाराज कुंडातील अनेक पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी नव्याने पायऱ्या करण्यात आल्या. परंतु आता काम संपत आलेले असूनही येथे नवीन पायऱ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. मध्यंतरी याच ठिकाणाहून परराज्यातील खासगी प्रवासी बस थेट नदीपात्रात उतरली होती.
दुतोंड्या मारुतीसमोरील कामही अपूर्ण आहे. याठिकाणी सकाळपासूनच फळविक्रेत्यांचे अतिक्रमण होते. एका बाजूला गटारीचे चेंबर, तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते.
अहिल्यादेवी होळकर पुलाखालीही काही कामे अपूर्ण आहेत. पात्राच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या नक्षीदार खांबांवर साखळ्या बसविण्याचे नियोजन असून, ते कामही अद्याप बाकी आहे.
रामसेतू रामभरोसेच
मध्यंतरी मोडकळीस आलेल्या रामसेतूच्या जागी स्मार्टसिटीकडून नव्या अर्धगोलाकार पुलाचे बांधकाम निश्चित करण्यात आले होते. संबंधित पुलाचा नकाशाही उपस्थित नाशिककरांना दाखविण्यात आला होता.
परंतु अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाची डागडुजी व्हावी, नवीन पूल नकोच अशी भूमिका काहींनी घेतल्यावर नवीन पुलाचा प्रस्ताव बाजूला पडला.
तत्पूर्वी या पुलाचे स्टक्चरल ऑडिट होऊन नवीन पुलाऐवजी केवळ डागडुजी करण्याचे निश्चित करण्यात आले. पुलाच्या मधोमध मोठे खड्डे पडूनही त्याची डागडुजीही झालेली नसल्याने तूर्त हा पूल रामभरोसेच असल्याचे दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.