Nashik News : एकेकाळी बॉलिवूडची मॉडर्न गर्ल असणाऱ्या ९९ वर्षीय स्मृती बिस्वास नारंग यांना औषधोपचार आणि उदरनिर्वाहासाठी चक्क गाणे विकण्याची वेळ आली आहे.
उदरनिर्वाहासाठी असणारा खर्च सध्या परवडत नाही म्हणून चक्क आम्हाला गाणे विकावे लागले असे त्यांचे चिरंजीव राजीव नारंग यांनी ‘सकाळ’ला सांगितले आहे. (Smriti Vishwas Narang have to sell music for medicine and livelihood nashik news)
जुन्या दशकात १९६०-१९९५ च्या काळात स्मृती विश्वास नारंग यांनी ९० हून अधिक चित्रपटात काम केले होते. काही चित्रपटात मुख्य नायिका तर काही चित्रपटांमध्ये साइड रोल केला आहे. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, दादा कोंडके, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, धर्मेंद्र, हेमामालिनी, राज बब्बर अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्मृती विश्वास नारंग यांनी काम केले आहे.
सध्या ते नाशिक रोड येथे चव्हाण मळ्यामध्ये भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना परवडत नाही. दोनही मुलांची लग्न झालेली नसून ती दोन्ही मुले आईची सेवा करतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांचे पती एस. डी. नारंग हे चित्रपट निर्माते होते. १९८५ ते ८७ च्या दशकात त्यांनी अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात वैष्णोदेवी आणि प्रेम गीत गाऊन घेतले होते, मात्र आजारपणामुळे चित्रपट पूर्ण झाला नाही.
हे गाणे व त्या गाण्याचे सर्व मालकी हक्क स्मृती बिस्वास नारंग यांच्याकडे आहेत. त्यांनी उदरनिर्वाहासाठी नुकतेच पंधरा हजार रुपयात तीन गाणे विकून उदरनिर्वाह भागवावा म्हणून निर्णय घेतला आहे.
"उत्पन्नाचे सध्या काहीच साधन नाही म्हणून आम्ही अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजातील गाणे विकण्याचा निर्णय घेतला. तात्पुरत्या स्वरूपात मिळालेल्या पैशात उदरनिर्वाह करीत आहे." - राजीव नारंग, स्मृती बिस्वास यांचा मुलगा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.