Marijuana seized with the two suspects. A team of the City Crime Branch including esakal
नाशिक

Nashik Crime News : कारमधून 12 किलो गांजाची तस्करी; शहर गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृतसेवा

Nashik Crime News : म्हसरूळ शिवारातील आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर स्विफ्ट कारमधुन गांजाची तस्करी करताना पोलिसांनी दोघांना अटक केली.

कारमधून 12 किलो गांजा जप्त केला आहे. (Smuggling of 12 kg of ganja from car at Mhasrul area nashik crime news)

शहर गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर स्विफ्ट कारमधुन गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, उपनिरीक्षक वेतन श्रीयंत, विष्णु उगले, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, नाझीम खान पठाण, देविदास ठाकरे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, किरण शिरसाठ या पथकांनी आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर मारूती स्विफ्ट कार (एमएच १५ सीडी ०३१७) अडविली.

संशयित कारचालक राहुल राज पवार (रा. पंचवटी नाशिक) यास शिताफाने पकडले. स्विफ्ट डिझायर कारची झडती घेतली असता त्यात १२ किलो ८४ ग्रॅम वजनाचा गांजा एका प्लास्टीक गोणीमध्ये मिळुन आला. मारूती स्विफ्ट डिझायर कार, ०३ मोबाईल फोन असा एकुण ६, लाख ३० हजार रूपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरचा माल त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड (रा. हिरावाड़ी, पंचवटी, नाशिक) याच्याकडुन विकत घेतला असल्याचे सांगीतले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाणेत अमली पदार्थ विरोधी कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक हेमंत तोडकर हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्य. डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे पथकाने केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT