Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील एका कर्मचाऱ्याच्या संगणकाजवळ असलेल्या प्रिंटरमध्ये बुधवारी (ता. २०) साप निघाला. प्रिंटर सुरू करत असताना अचानक साप निघाल्याने कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
छोटा साप असल्याने त्यास पकडून लागलीच सर्पमित्राच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. (snake in Nashik ZP employees printer)
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीची डागडुजी करण्याचे काम सुरू होते. परंतु, हे कंत्राट रद्द करण्यात आल्याने काम बंद आहे. यामुळे अनेक विभागातील काम अर्धवट राहिलेले आहे. रंगरंगोटीसाठी आवारात अनेक वस्तू पडून आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गत महिन्यात केलेल्या मुख्यालय पाहणीदरम्यान, कृषी विभागाबाहेरील बांधकाम विभागातील इलेक्ट्रिक विभागाकडील विनावापर पॅनल हटविण्याचे आदेश दिले होते.
प्रत्यक्षात दीड महिना उलटूनही हे पॅनल हटविण्यात आलेले नाही. तसेच याच विभागाजवळील पडून असलेल्या लोखंडी जाळ्या बाजूला करण्यास टाळाटाळ केली जात आहे. निर्लेखित झालेले शासकीय वाहनेदेखील पडून आहेत.
वर्षोनुवर्षे या वस्तू, वाहने पडून असल्याने यात साप, विंचू यांसारखे प्राणी वास्तव करतात. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. यातच बुधवारी तळमजल्यावर असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील पहिल्याचं रांगेत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या प्रिंटरमध्ये दुपारी साप निघाला.
संबंधित कर्मचारी हा संगणकावरून प्रिंट देत असताना, त्याने प्रिंटर उघडले असता त्यातून साप बाहेर आला. त्यानंतर कर्मचाऱ्याने आरडाओरड केली. छोटा साप असल्याने त्यास पकडण्यात यश आले.
पकडण्यात आलेला हा साप काचेच्या बरणीत ठेवण्यात आला. त्यानंतर सर्पमित्र राहुल नाईक यांना फोन करून बोलाविण्यात आले व त्यांना साप सुपूर्द करण्यात आला. या प्रकारामुळे कर्मचारीवर्गाची चांगलीच धावपळ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.