Social Media Sakal
नाशिक

Social Media Precaution : सावधान! सोशल मीडियावर अतिउत्साहाने व्यक्त होऊ नका.... नाहीतर

सागर आहेर

Social Media Precaution : गेल्या काही वर्षात अनेकांना सोशल मिडियावर सक्रिय राहण्याची सवय लागली आहे. त्यामध्ये उच्चशिक्षित युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

धार्मिक, राजकीय, देशविरोधी विषयांवर पटकन रिॲक्ट होण्याची सवय आणि भावनेच्या भरात किंवा अनवधानाने का होईना सोशल मीडियावर केलेल्या एका चुकीच्या पोस्टमुळे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते.

त्यामुळे भविष्याचा सारासार विचार करूनच सोशल मीडियावर पोस्ट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सायबर पोलिसांनीही तसे आवाहन केले आहे. (social media precautions One wrong post on social media can ruin an entire career nashik news)

सध्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, दलित या वर्गात एकमेकांविरोधी असल्याचे वातावरण तयार करण्यात येत आहेत. पुढे याचा वापर राजकीय स्तरावर एकगठ्ठा मतांसाठी होतो. दुसरीकडे देशविघातक प्रवृत्ती या ऑनलाइन माध्यमाने घरबसल्या आपल्या देशातील सामाजिक सहिष्णुता आणि सौहार्द यांचे नुकसान करतात.

देशातील कायदा व सुव्यवस्थेची धोक्यात आणून अराजकाची परिस्थिती निर्माण करून देशाची प्रगती खंडित होईल असा त्यांचा मानस असतो. यात सामान्य माणसासह देशाचे नुकसान होते.

कुणीतरी माथे भडकविणारी पोस्ट फेसबुक, ट्विटर किंवा वॉट्सॲपवर टाकते आणि त्या पोस्टची कोणतीही शहानिशा न करता थेट शेअर करून ते व्हायरल करण्यावर काही बेजबाबदार लोकांचा, युवकांचा भर असतो. त्यावर अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशा पोस्ट मुद्दाम व्हायरल करण्यात येतात, जेणेकरून सामाजिक शांतता भंग होईल, त्यामुळे युवकांनी आपल्या सदविवेकबुद्धीचा वापर करून कुणाच्या कटाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

भविष्यावर होणारे परिणाम

जर एखाद्या उच्चशिक्षित युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती पोस्ट देशविरोधी कारवाया, धार्मिक दंगलीस कारणीभूत, अश्लील किंवा राजकीय द्वेष पसरविणारी असल्यास पोलिस थेट आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करतात.

त्यानंतर युवकाला अटक, जामीन, न्यायालयीन लढाई, सुटका अशा प्रक्रियेचा सामना करावा लागतो. शासकीय नोकरीसाठी तो पात्र ठरत नाही. कोणत्याही शासकीय सेवेत त्याला जागा मिळवता येत नाही. पासपोर्ट आणि विदेश प्रवास सुद्धा करता येत नाही.

असे करावे संबंधित खाते बंद

अशा आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजाचे आणि देशाचे नुकसान होत असल्याने अशा पोस्ट दिसून आल्यास त्या अँपवर जाऊन त्यांचा रिपोर्ट करावा. यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप यावरून काही मिनिटातच बंद होऊ शकतात किंवा संबंधित अँप त्यास बॅन करू शकते.

"कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमावर धार्मिक भावना भडकविणारे व खोट्या बातम्या फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारित करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कट कारस्थानात आपण किंवा आपले मित्र आप्त ओढले जाऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात आल्यावर आपले भविष्य अंधारात जाऊ शकते."- पी. वाय. कादरी, सहायक पोलिस निरीक्षक, सायखेडा

"अजाणतेपणाने केलेली एखादी फॉरवर्डेड पोस्ट संबंधित व्यक्तीसोबतच समाजालादेखील नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्यात. पोस्ट जबाबदारीनेच करावी." - सिद्धार्थ वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, चांदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT