नाशिक : 'एक लिखा और हजार बका' म्हणजेच एक अक्षर एक चित्र हजारो भावनांचे प्रतिक असते. सार्वजनिक ठिकाणी चित्र संकल्पनांचा वापर करून जाणीव जागृतीपर संदेश पोहचवण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या वतीने संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांच्या संकल्पनेतून रहदारीच्या रस्त्या लगत मसगा महाविद्यालयाच्या कंपाऊंडच्या भिंतीवर दोन्ही संस्थाच्या विविध शाखेवरील कला शिक्षकांनी आकर्षक चित्रे रेखाटून परिसराचे रुपडे पालटले आहे.
संस्थेला नुकतेच ७५ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्त संस्थेच्या विविध महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबविले जात आहेत. चित्राद्वारे ठोस सामाजिक संदेश द्यावा असे ठरवून संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांनी कला शिक्षकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध विषयावर कलाशिक्षकांकडून चित्रे तयार करून घेण्यात आली. यात पर्यावरण सामाजिक सलोखा, लेक वाचवा, ऐतिहासिक वास्तू आदी विषयातून चित्रातून निवड करून संस्थेच्या "बहुजन हिताय,बहुजन सुखाय" या ब्रीद वाक्याला अनुसरून संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा स्मिता हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त अद्वय हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंती रंगवण्यात आल्या असून मालेगाव परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे. याठिकाणी मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी याठिकाणी भेट देऊन कलाशिक्षकांचे कौतुक करून सामाजिक प्रबोधनपर कार्याला शुभेच्छा दिल्यात.
कलाशिक्षक सुनील गवळी, संजय जगताप, संदीप पवार, संजय पाटील, हंसराज देसले, जगदीश आहेर, राजू पठाण, गणेश पाटील, इप्तेखार अहमद, महेंद्र बागुल, सुरेश जगताप, बबलू पठाण, प्रदीप श्रीराम पाटील, गणेश परदेशी, सोनवणे, खंडेराव ताठे, जितेंद्र शिंदे, संजय कदम, ज्योती सानप, शैला अहिरे, जयदीप शेवाळे, नरेंद्र खैरनार, योगेश सोनवणे, आशा पगार, रोहिणी देवरे, सुरेश जगताप, दीपक चव्हाण, प्रेम ब्राहीकर, सोनल वाघ, राजू पठाण, भाऊसाहेब देवरे, किरण भामरे, दत्तात्रय काकळीज, अण्णा शिंदे या ३८ कलाशिक्षकांनी लेक वाचवा, कोरोना बचाव, प्लास्टिक प्रदूषण, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, आदी विषयातून १२०० फूट भिंतीवर "बोलकी भिंत" साकारली आहे. शरद बाविस्कर, नवनीत देवरे, प्राचार्य प्रदीप सोनवणे यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.