माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर sakal media
नाशिक

अष्टपैलू कामगिरीने नेतृत्व गाजवणारे डॉ. दौलतराव आहेर

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, तसेच कृषी क्षेत्रात जवळपास तीन दशके आपल्या अष्टपैलू कामगिरीने कर्तृत्व व नेतृत्व गाजवणारे आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांची सोमवारी (ता. १) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला दिलेला हा उजाळा...

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, तसेच कृषी क्षेत्रात जवळपास तीन दशके आपल्या अष्टपैलू कामगिरीने कर्तृत्व व नेतृत्व गाजवणारे आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांची सोमवारी (ता. १) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला दिलेला हा उजाळा...

राजकारणात संधी बऱ्याच जणांना मिळते. परंतु आपली क्षमता सिद्ध करणारे मोजकेच असतात. डॉ. दौलतराव आहेर त्यापैकीच एक होते. आमदार, खासदार, मंत्री, तसेच इतरही संस्थांवर प्रतिनिधित्व करताना त्यांनी उल्लेखनीय कामे केली. यासोबत वैद्यकीय व्यवसायाचा सेवाभावही त्यांनी जोपासला. १९८५ मध्ये आपली उत्तम चालणारी प्रॅक्टिस सोडून डॉक्टरांनी राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात ते नाशिकमधील भाजपचे पहिले आमदार झाले. जुने-जाणते नेते, प्रामाणिक कार्यकर्ते, मोठा जनसंपर्क व अभ्यासू राजकारण यामुळे त्यांनी या राजकीय प्रवासात मागे वळून पहिलेच नाही. अन्यायाविरुद्ध दंड थोपटनारा नायक, भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगणारे नेते आणि त्याचबरोबर आमदार निधीतून विधायक कामांचा आदर्श उभा करणारे लोकप्रतिनिधी अशी विविध रूपे दाखवत त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.    

डॉ. दौलतराव आहेर ऊर्फ बाबांची आमदारकीची चमकदार कामगिरी पाहून नाशिकच्या जनतेने त्यांना १९८९ मध्ये नाशिकचे खासदार म्हणूनही निवडून दिले. असे असले तरी नाशिक या कर्मभूमीसोबत त्यांचे देवळा या जन्मभूमीकडेही लक्ष होतेच. दरम्यानच्या काळात ते नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य अशा मराठा विद्याप्रसारक समाज या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. हे पद भूषविताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यालयांना सुसज्ज इमारती उभारण्यास प्राधान्य दिले. कसमादेला वरदान लाभलेला वसाका कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी व वैभवाकडे नेण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. शेवटच्या श्वासापर्यंत वसाका चालू व्हावा, यासाठी ते आग्रही होते.

१९९५ मध्ये राज्याच्या आरोग्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तर त्यांच्या कार्याच्या कक्षा विस्तारत गेल्या. राज्याच्या आरोग्य खात्याचे आरोग्य सुधारण्यासाठी वैद्यकीय पदवीधरांना ग्रामीण भागातील सेवा बंधनकारक केली. नाशिकला विभागीय स्तरावरील संदर्भ सेवा रुग्णालयाची स्थापना केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निर्मिती करत वैद्यकीय शाखांमध्ये सुसूत्रता आणली. एवढेच नव्हे, तर जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांची सुधारणा आणि औषधे व साहित्यातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासोबत जीवनदायी योजना, मातृत्व अनुदान योजना सुरू केल्या. नद्याजोड प्रकल्पासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते. कसमादे तालुक्याचा तापी खोऱ्यात समावेश करून या भागातील पाणीपुरवठा योजनांना गती दिली. चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगावपर्यंत पोचेल, यासाठी चणकापूर उजवा कालवा केला. शिवाय देवळा व त्र्यंबकेश्वर तालुकानिर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा असो की नाशिक सावानाच्या बाजूला असलेले ग्रंथभूषण मु. श. औरंगाबादकर व लिमये सभागृह असो अशा अनेक विधायक कामांसाठी निधी मिळवून देण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली. नाशिकमध्ये आयोजित नाट्य संमेलनात स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळत रंगभूमीसाठीही त्यांनी सेवा समर्पित केली. त्यांनी मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. सहकारी बँकिंग क्षेत्रात नाशिक येथे राजलक्ष्मी बँकेची स्थापना करून विविध गुणिजनांना बँकेच्या संचालक मंडळात घेतले. त्यांच्याच विकासाचा वारसा व जनसेवेचा वसा त्यांचे पुत्र आमदार डॉ. राहुल आहेर, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यशस्वीपणे निभावत आहेत. लोकसेवेचा ध्यास घेतलेले, जनमानसाच्या मनामनावर राज्य करणारे सर्वसामान्यांचे हे पाणीदार नेतृत्व १९ जानेवारी २०१६ मध्ये काळाच्या पडद्याआड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT