पंचवटी (जि. नाशिक) : गोदाघाटावर भाविक आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिका (NMC) प्रशासनाने व्यावसायिकांसाठी उभारलेल्या गाळ्यांपैकी काही गाळे वापराविना धूळखात आहेत. (Some of shops In Godaghat set up by municipal administration for businessmen are lying unused nashik news)
यामुळे महापालिकेच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून, लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. ज्यासाठी या गाळे संकुलाची उभारणी करण्यात आली, त्याऐवजी अडगळीच्या वस्तू फेकण्यासाठीच गाळ्यांचा उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटीसारख्या धार्मिक, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गाळे संकुलात टपाल कार्यालयवगळता इतर सर्व गाळे वापराविना आहेत. या संकुलाचा तळमजला हा खास पार्किंगसाठी सोडण्यात आलेला आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर गाळे काढण्यात आलेले आहेत. यातील काही गाळ्यांचे शटर कायम अर्धवट उघडे असते. काचेच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. येथील टपाल कार्यालयात येणाऱ्यांची वाहने पार्किंगच्या जागेत पार्क करणे अवघड होते. याच पार्किंगच्या जागेत इतर वाहने पार्क केली जातात. तसेच, कपड्यांच्या गाठोड्यांचा ढिगारा येथे पडलेला असतो.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
येथे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा अडथळा पार करून जावे लागते. गंगाघाटाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या या गाळे संकुलाच्या बाजूला म्हसोबा पटांगण असल्याने या भागात नाशिकच्या धार्मिक तीर्थ स्नानावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाहने थांबतात. त्यामुळे येथे अनेक व्यवसाय होऊ शकतील, अशा उद्देशाने या गाळे संकुल उभारण्यात आले असले तरी व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते गाळे पडून आहेत.
दर परवडत नाही...
पेठ रोडला पालिका बाजारही असाच रस्त्यालगतच्या भागात असूनही तेथील व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या झोपडपट्टीच्या परिसरात राहणारा वर्ग त्याच्याकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू यांना मर्यादा असल्यामुळे कमी दराचे भाडे असलेले गाळे मिळत नाहीत.
गाळ्यांचे भाड्याचे दर परवडत नसल्यामुळे येथील व्यावसायिकांनी गाळे सोडून दिल्यामुळे हा पालिका बाजारही वापराविना पडून असल्याने तेथे अडगळीचे साहित्य टाकण्यात येत असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.