A wheat crop blooming in the field of Prashant Sanap, a progressive farmer here. esakal
नाशिक

Wheat Experiment: नगरसूलला खपली गव्हाची पेरणी; प्रयोगशील प्रशांत सानप यांचा येवला तालुक्यात प्रयोग

सुदाम गाडेकर

नगरसूल (जि. नाशिक) : कृषी पदवीधर असलेले येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत सानप यांनी देशी गव्हाचे वाण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या खपली गहू पेरणीचा प्रयोग येवला तालुक्यात पहिल्यांदाच यशस्वी करून एक आदर्श निर्माण केला आहे.

कृषी विषयक अभ्यासातून खपली गव्हाची उपयुक्तता जाणून घेतली व पेरणीचा निर्णय घेतल्याचे प्रशांत सानप यांनी सांगितले. (Sowing of husked wheat in Nagarsul Prashant Sanap experiment in Yeola taluka nashik news)

इतिहासाचा मागोवा घेत खपली गव्हाची जात ही पाच हजार वर्षांपूर्वीची असल्याचा निष्कर्ष अनेक कृषी अभ्यासकांनी काढला आहे. धारवाड कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन व अभ्यासातून खपली गहू एक वैशिष्ट्य पूर्ण व मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

खपली गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे पोळीला लालसरपणा असतो. ती अधिक चविष्ट लागते. खपली गव्हापासून पुरण-पोळी, खीर, लापशी सारखे पदार्थ छान बनतात.

मधुमेहींना उपयुक्त

मधुमेह, हृदयविकार, आतड्याचा कर्करोग, बद्धकोष्ठता, हाडांची झिज, दातांच्या तक्रारी आदी आजारांत आहारासाठी खपली गहू योग्य मनाला जातो. विशेषतः मधूमेहासाठी डॉक्टर कटाक्षाने खपली गहू खाण्यास सांगतात.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, पित्तशामक, शक्तिवर्धक असल्याचे सांगितले जाते. खपली पचावयास हलका असून शेवया, कुरडया, बोटूकली, खीर, रवा, पास्ता आदी पदार्थ बनविण्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः या गव्हात ग्लुटेन ची मात्रा अतिशय कमी असल्याने मधुमेहींना फार उपयुक्त असल्याचे प्रशांत सानप यांनी सांगितले.

एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या गव्हास एक ठोंबास १४ ते २८ पर्यंत फुटवे असून एकरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल असा विश्वास श्री. सानप यांनी व्यक्त केला आहे .सानप यांनी खपली गव्हाचा प्रयोग यशस्वी झाल्याने इतरही शेतकरी पीक पाहणी व निरीक्षण करण्यासाठी सानप यांच्या शेतात येत आहे.

"मी स्वतः कृषी पदवीधर असल्याने अभ्यासातून या वाणाची माहिती मिळाली. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून हे बियाणे उपलब्ध करून पेरणी केली. मानवी शरीरासाठी आवश्यक असलेले सर्वच घटक या गव्हात असल्याने भविष्यात या गव्हाचे पेरणी क्षेत्र व वापर नक्कीच वाढेल."

-प्रशांत सानप, कृषी पदवीधर, नगरसू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT