A deserted garden behind the Marathi school at soygaon esakal
नाशिक

Nashik News: सोयगाव भागातील उद्यान नवसंजीवनीच्या प्रतिक्षेत? महापालिका प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बाबींमध्ये उद्याने महत्वपूर्ण ठरतात. शहरातील अनेक उद्यान महापालिकेच्या अनास्थेमुळे भकास झाली आहेत. उद्यानांची देखभाल व दुरुस्तीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जाते.

सर्वात मोठी वसाहत असलेल्या सोयगाव परिसरातील उद्यान गेल्या दोन वर्षांपासून उद्याने ओसाड पडले आहे. या परिसरातील वृध्द, महिला व बच्चे कंपनीला रमणीय ठरणाऱ्या या उद्यानाला महापालिका नवसंजीवनी देईल का? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी केला आहे. (Soygaon area park waiting for revival Neglect of malegaon municipal administration to repair Nashik News)

सोयगाव मराठी शाळेमागील व दौलत नगर परिसरात असलेल्या उद्यानाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या परिसरात उद्यान विकसित झाले होते. आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिक व महिलांनी योग्य वापर योगा वर्ग, ज्येष्ठांची मैफल रंगत होती.

खेळणारी मंडळी सरावासाठी तर विविध भरतीसाठी सराव करणाऱ्या अनेकांचा सकाळ सायंकाळ राबता होता. संरक्षक कुंपण व शेड असल्याने सर्वांनाच फायदेशीर ठरत होते.

दरम्यान कोरोनाचा काळात पूर्णतः उदासीनता झाल्याने या बंदीस्त अशा उद्यानाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले.

सध्याच्या परिस्थितीत मोकाट जनावरे, भटके कुत्रे, साप,विंचू यांच्यासह मोकळी निवांत जागेच्या शोधात असलेल्या दारूड्यांना आणि टवाळखोर यांच्यासाठी हे उद्यान उपयुक्त ठरते आहे. वाढलेले गवत, झाडे, झुडपे ही अवकळा असली तरी लगतच्या युवकांनीही महापालिकेच्या भरवशावर स्वच्छता न करता दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

स्थानिकांनी लक्ष देण्याची गरज

उद्याने ही वेगळी ओळख व निरामय स्वास्थ्यासाठी आवश्यक आहेत. उद्यानांचा विकास व देखभालीअभावी मोडकळीस आलेल्या उद्यानांकडे नागरिक फिरकतही नाहीत. सोयगाव भागातील डी. के. कॉर्नरजवळ दादा भुसे यांच्या संकल्पनेतून दोन कोटी १५ लाख रुपये निधी खर्चून उद्यान विकसित झाले.

साठ फुटी रोडवर रोटरीचे 'रोटरी गार्डन', कॅम्प भागात रोटरी मिडटाऊनच 'रोटरी कल्याण 'गार्डन' 'नुरी गार्डन', सावित्रीबाई फुले गार्डन, गीता गार्डन, ओम शांती गार्डन हे नागरिकांसाठी आकर्षण आहेत.

या उद्यानांकडे महापालिका सातत्याने लक्ष पुरवते. मात्र, शहरातील अनेक उद्याने देखभाल-दुरुस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहेत. या उद्यानाकडे स्थानिकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

"या परिसरातील जवळची जागा म्हणून आम्हा ज्येष्ठांना योग्य वाटते. कुठल्याही माध्यमातून का होईना या उद्यानाला थोडेफार ऊर्जितावस्था देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक व बच्चे कंपनीला परस्परपूरक व योग्य ठरणारे आहे. अनेक युवकांसाठीही उद्यान विकसित करण्याची आमची मागणी आहे."

- डी.के.देशमुख, स्थानिक नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT