Nashik News : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी धडक कारवाईचे हत्यार उपसले आहे. तरीही जंगलात चोरीछुपे गावठी हातभट्ट्या सुरू असल्याने पोलिसांनी ३१ अड्डे उद्ध्वस्त केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मोहिमेचे नेतृत्व केल्याने अवैध व्यावसायिकांसह स्थानिक पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. (SP involved in action against gavthi liquor in district Action at 31 locations Nashik News)
जिल्ह्यात ग्रामीण भागात छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या धंद्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक उमाप यांनी नागरिकांना केले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आठ विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील डोंगर, दऱ्याखोऱ्यात नदी-नाल्यांलगत गावठी दारू हातभट्ट्या सुरू आहेत. याची माहिती मिळताच अधीक्षकांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने ३१ ठिकाणी छापे टाकून अड्डे नष्ट केले.
गावठी दारू, रसायन, साधनसामग्री असा पाच लाख ४७ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ३७ संशयितांविरोधात ३१ गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातीली मोहिमेत पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू आहे. चांदवड तालुक्यातील वडबारे शिवारात असलेल्या गणेशा डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या अड्ड्यावरील कारवाईत पोलिस अधीक्षकही सहभागी झाले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या ठिकाणी झाली कारवाई
ठिकाण......कारवाई
जायखेडा ......८
सटाणा..........४
वाडीवऱ्हे........३
मालेगाव तालुका.....३
कळवण ..........२
घोटी......१
पेठ........१
सायखेडा.......१
देवळा.........१
सुरगाणा......१
नांदगाव......१
चांदवड ........१
मालेगाव किल्ला.....१
एकूण : ३१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.