मालेगाव : साकूर (ता. मालेगाव) येथील मधूगिरीजी महाराज यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांना महसूल प्रशासनाने तत्काळ शिधापत्रिका उपलब्ध करून दिले. त्यामुळे गरजूंना महसूल विभागाच्या तत्परतेचा अनुभव आला.
तालुक्यातील सामान्य नागरिक बऱ्याच दिवसांपासून ही तत्परता अनुभवत आहेत. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या पुढाकाराने कामकाजात पारदर्शकता व तत्परता दिसून येत आहे. (Spirituality got support of administration Ration made treatment easier Revenue readiness Nashik News)
महसूल प्रशासनाच्या कामाचा प्रत्यय साकुरच्या परमपूज्य जनार्दन स्वामी आश्रमातील भक्तगणांना आला. साकुर येथील शिक्षक मनोहर मगर व लखाने येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी साहेबराव वाघ हे मधूगिरीजी महाराज यांचे भक्त आहेत.
गेल्या आठवड्यात महाराजांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते नाशिकमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्री. मगर आणि श्री. वाघ यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यासंबंधीची माहिती दिली.
तहसीलदारांनी महाराजांचे सामाजिक व आध्यात्मिक कार्य जाणून घेत तत्काळ पुरवठा विभागातील कर्मचारी राहुल घोडेराव यांना शिधापत्रिका बनविण्याची सूचना केली. महाराजांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे तपासून शिधापत्रिका व वैद्यकीय उपचारांसाठी प्रमाणपत्र देण्यात आले.
मधूगिरीजी महाराज गेल्या ४५ वर्षांपासून साकूर आश्रमात आध्यात्मिक व सेवाभावी मार्गाने पूजाविधी, भागवत कथा असे विविध कार्यक्रम राबवतात. तेथील गो-शाळेचे काम महाराज पाहतात.
दरवर्षी गरिबांना अन्नदान व इतर उपक्रम ते राबवतात. मधूगिरीजी महाराजांच्या वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ शिधापत्रिका मिळाल्याने भक्तांनी तहसीलदार आणि पुरवठा विभागाचे आभार मानले.
"मी मधूगिरीजी महाराज यांचे कार्य जाणून घेतल्यानंतर तत्काळ त्यांची रहिवासी कागदपत्रे तपासून शिधापत्रिका देण्यात आली. या माध्यमातून एक पुण्याचे काम करता आले याचे समाधान वाटते."- नितीनकुमार देवरे, तहसीलदार, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.