येवला (जि. नाशिक) : वडील बारावी सायन्स उत्तीर्ण; पण परिस्थितीअभावी शिक्षण थांबले. त्यात घरची परिस्थिती बेताची. पण आपले शिक्षण झाले नाही म्हणून काय झाले, मुलांनी तरी शिकावे हे स्वप्न घेऊन मुलांच्या शिक्षणाची तळमळ ठेवणाऱ्या सावरगाव येथील शेतकरी देवीदास काकड यांची स्वप्नपूर्ती त्यांच्या लेकीने पूर्ण केली. वेळोवेळी शेतीकामात अन् घरकामात मदत करून अभ्यास करत तिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के तर एकत्रित निकाल ९७.१९ टक्के लागला. प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जबाबदारीही निभावत वैष्णवी काकड सेमी माध्यमात ९०.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आली. द्वितीय क्रमांक मराठी माध्यमाची कीर्ती गायकवाड (९०.२०) हीने मिळवला. कीर्ती शेतकरी कुटुंबातील असून, अनकुटे येथून सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून शाळेत यायची. शाळेतून घरी आल्यावर आई-वडिलांना मदत करत तिने हे यश मिळवले. तृतीय क्रमांक श्रुती निकम (८९.८०) हिने मिळवला. तिचे वडील शंकर निकम प्राथमिक शिक्षक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यश मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षणप्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील, सहसचिव प्रविण पाटील, युवा नेते संभाजीराजे पवार, माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, पर्यवेक्षक व्ही. एन. दराडे, योगेश भालेराव, उमाकांत आहेर, गजानन नागरे, वसंत विंचू, पोपटराव भाटे, कैलाश मोरे, उज्वला तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (ता. १८) सत्कार करण्यात आला. प्राचार्य ढोमसे, श्री. दराडे, जेष्ठ शिक्षक साहेबराव घुगे, यशवंत दराडे, नामदेव पवार, लक्ष्मण माळी, संतोष विंचू, राजकुवर परदेशी, योगेश पवार, रविंद्र दाभाडे, संजय बहीरम, भाग्यश्री सोनवणे, सगुना काळे, सविता पवार, अर्चना भुजबळ, प्रमोद दाणे, विकास व्यापारे, हृषीकेश काटे, मयूरेश पैठणकर, रोहित गरुड, सुनील चौधरी, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे, सागर मुंढे आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.