MSRTC Staff esakal
नाशिक

Nashik News: ‘एसटी’च्या चालक-वाहकांना RTOमध्ये प्रतिनियुक्ती! सध्या कार्यरत जिल्ह्यातच संधी

या कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता. २)पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी प्रलंबित असताना या महामंडळातील चालक-वाहकांना आता महसूल विभाग किंवा प्रादेशिक परिवहन विभागात प्रतिनियुक्तीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

त्यासाठी या कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता. २)पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. (st drivers deputed to RTO Opportunity in current working district only Nashik News)

राज्य परिवहन महामंडळात नियुक्त झालेल्या चालक व वाहकांना प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी २८ डिसेंबर २०२३ ला काढले.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह २३ जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यरत अतिरिक्त चालक व वाहक असतील त्यांना त्याच जिल्ह्यातील ‘आरटीओ’मध्ये प्रतिनियुक्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी मूळ वेतन १७ हजार ८० या वेतनश्रेणीतील चालक व वाहकांकडून अर्ज मागवले आहेत.

महामंडळाकडून प्रतिनियुक्तीवर ‘आरटीओ’कडे कंत्राटी चालक पदातील सेवा-शर्तीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पाठविण्यात येणार आहे. त्यांना ‘आरटीओ’च्या अटी व शर्ती लागू राहतील. त्यांना सध्या मिळत असलेल्या वेतनानुसार वेतन मिळणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी महाव्यवस्थापकांनी दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत, असे महाव्यवस्थापक भरसट यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे एसटी महामंडळात अतिरिक्त ठरणाऱ्या चालक-वाहकांना यानिमित्ताने आरटीओ किंवा महसूल विभागात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती

एसटी महामंडळातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा काम करण्याची संधी मिळेल की नाही, याविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.

महसूल किंवा आरटीओ कार्यालयात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर तिकडे वेतन वेळेत मिळेल का, याविषयी साशंकता वाटते. याशिवाय कंत्राटी म्हणून भविष्यात काढून टाकले, तर कोणाकडे दाद मागायची, याविषयी चालक-वाहकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.

"नाशिक विभागात एकही चालक, वाहक अतिरिक्त नाही. जागा अगोदरच रिक्त असल्याने अतिरिक्त ठरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे विभागातून एकही चालक, वाहक अर्ज करण्यास पात्र नाही."- अरुणकुमार सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT