st esakal
नाशिक

Nashik | ऐन दिवाळीत 3 ST कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ऐन दिवाळीत (diwali festival) नाशिकमध्ये तब्बल 3 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ST कर्मचारी घेत असलेल्या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. यात एका कर्मचाऱ्याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब बोलणार की नाही?

इगतपुरी तालुक्यात दोन कर्मचाऱ्यांनी आणि कळवणध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनी कर्मचाऱ्यांमध्ये पराकोटीचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील दहा कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे एकाने रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा तर दुसऱ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

कळवण आगारातील प्रमोद सूर्यवंशी या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रजेचा अर्ज वेळेत मंजूर न झाल्याने केवळ २ हजार पगार आणि अडीच हजार बोनस असे एकूण साडेचार हजार सूर्यवंशींना मिळाले. परंतु इतक्या कमी पैशात आजारी आई-बायकोवर उपचार करू की दिवाळीसाठी मुलांना कपडे घेऊ असा प्रश्न त्यांना पडला. पैशाची चणचण भासत असताना प्रमोद सूर्यवंशी यांनी हताश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांनी विष प्राशन केले.सुदैवाने सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने तात्काळ त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांच्या प्रयत्नाने प्रमोद सूर्यवंशी बचावले. सध्या सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ST कर्मचारी घेत असलेल्या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. ST कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून अद्यापही काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब बोलणार की नाही? महाविकास आघाडी सरकार कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करणार का? यासारखे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.

अजून ठोस तोडगा निघत नाही

एसटी कर्मचाऱ्यांनी एकीकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार पातळीवर त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, त्यावर अजून ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच इगतपुरी तालुक्यात दोन कर्मचाऱ्यांनी आणि कळवणध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहेत मागण्या?

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिले जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच. आर. वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढे असतो. तरीही त्याच्यावर अन्याय होतो म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यात दिवाळी तोंडावर २७ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू करण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. सोबतच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT