नाशिक : (म्हसरूळ) कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे फोनवरून, तसेच प्रत्यक्ष येऊन धमकी देत असल्याची तक्रार सभापती व संचालक मंडळाला केली. त्या अनुषंगाने सभापती संपत सकाळे व संचालक मंडळाने चुंभळे यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
बाजार समिती विकास कामांवर विपरित परिणाम
बाजार समितीत माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सर्वानुमते संमत करत सभापतिपदी संपत सकाळे विराजमान झाले. त्यानंतर बाजार समितीची ठप्प झालेली विविध विकासकामे मंजूर करून चालना देण्याचे काम सुरू आहे. याविषयी गैरसमज बाळगून बाजार समिती कर्मचाऱ्यांना फोनवरून "तुला पाहून घेईन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी लावेन. मला जर माहिती सांगितली नाही, तर ठार मारून टाकीन', अशा धमक्या देत असल्याची लेखी तक्रार कर्मचाऱ्यांनी सभापती संपत सकाळे व संचालक मंडळाकडे केली. सभापती व संचालक मंडळाने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यात शिवाजी चुंभळे हे पदावरून पायउतार झाल्यापासून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमबाजी करीत बाजार समिती कार्यालयात दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळे कर्मचारी तणावाखाली काम करीत असून, त्यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. बाजार समिती विकास कामांवर विपरित परिणाम होत आहे. पोलिस आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून कायदेशीर कारवाई करत कर्मचाऱ्यांना भयमुक्त करावे, असे तक्रारअर्जात म्हटले आहे.
शिवाजी चुंभळे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमबाजी करीत असल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली. त्यावर मी संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची चौकशी करून पोलिस आयुक्तांना तक्रार केली. पोलिस प्रशासनावर विश्वास असून, बाजार समिती भयमुक्त करण्यास मदत करतील, अशी आशा आहे. - संपत सकाळे, सभापती, कृउबा
मी बाजार समितीकडे सभेत संमत झालेल्या ठराव व ऑडिट रिपोर्टची मागणी करत आहे. त्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनीही छायांकित प्रत द्यावी, असे आदेशित केले आहे. तरीही कर्मचारी मला कुठलीही दाद देत नाहीत. पोलिस आयुक्तांना केलेला तक्रारअर्ज म्हणजे माझ्या विरुद्ध रचलेले कुभांड आहे. - शिवाजी चुंभळे, माजी सभापती
हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन् अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्ध्वस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.