Nashik Municipal Corporation Google
नाशिक

मानधनावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ; स्थायी समितीचा निर्णय

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाची संभावित तिसरी लाट लक्षात घेता महापालिकेने मानधनावर रुजू केलेल्या ११०८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासली होती. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मानधनावर सुमारे साडेपाचशे पदे भरली. त्यानंतर फेब्रुवारी अखेरपासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेने मागील सर्व विक्रम मोडीत काढले. (Standing Committee has decided to extend the tenure of the medical staff in nashik)


सर्व खासगी व शासकीय रुग्णालय फुल झाली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासली. त्यामुळे महापालिकेने ११०८ वैद्य कर्मचाऱ्यांची पदे भरली. कोरोना काळामध्ये भरलेल्या या पदामुळे मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. आता दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ११०८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला. त्यानुसार स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी शुक्रवारी (ता.२५) झालेल्या सभेमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ११०८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आठ कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. मानधन तत्त्वावर भरलेल्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांची मुदत पूर्ण होत असल्याने दोन दिवसांची सेवा खंडित करून ही मुदतवाढ दिली जाणार आहे.


वॉटर ग्रेसकडे कोटीची थकबाकी

कोरोना काळात जैविक कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट करण्यापोटी वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीला ४६. ६६ लाख रुपये बिल देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने अडवून धरला आहे. वॉटर गॅस कंपनीकडे महापालिकेचे एक कोटी रुपये थकबाकी आहे. सदरची थकबाकी वसूल करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या, मात्र अद्यापही ती वसुली झाली नाही. असे असताना नव्याने देयके करू नये, अशी भूमिका मागील स्थायी समितीच्या सभेत सदस्य सुधाकर बडगुजर यांनी मांडली होती. या वेळी वैद्यकीय विभागाला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही आज देयके अदा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या संदर्भात तीन दिवसात स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले. तोपर्यंत देयके अदा करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

(Standing Committee has decided to extend the tenure of the medical staff in nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT