Private travels esakal
नाशिक

Nashik News: खासगी प्रवासी वाहन चालकांवर उपासमारीची वेळ! कुटुंब सांभाळून कर्जाचे हप्ते फेडणे झाले जिकरीचे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे त्याचा परिणाम हा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर आता होत असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

एकीकडे कुटुंब सांभाळणे तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते फेडणे मोठे मुश्कील झाले असल्याने खासगी वाहनचालक चिंताग्रस्त झाले आहे. (Starving time for private passenger vehicle drivers difficult to pay loan installments while taking care of family Nashik News)

राज्यातील प्रवासी यांना आकर्षक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ७५ वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ नागरिक यांना एसटीचा प्रवास मोफत तर सर्व महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आला.

या योजनांच्या अंमलबजावणीमुळे एसटी प्रवासाला सुगीचे दिवस आले आहे. यामुळे मागील पाच महिन्यात एसटीचे उत्पन्न वाढ होत आहे. मात्र याचा थेट परिणाम हा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर होऊ लागला आहे.

एसटी मध्ये मिळत असणाऱ्या सवलतीमुळे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. प्रवाशांअभावी खासगी वाहनचालक मेटाकुटीला आला आहे.

मनमाड शहर हे रेल्वेचे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. देशभरात जाण्यासाठी येथे रेल्वे गाड्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांचे ये-जा या रेल्वे स्थानकावर असते.

विशेष म्हणजे शिर्डी येथे साईबाबा यांच्या दर्शनाला जाण्यासाठी काही साई भक्तांना मनमाड हे सोईचे रेल्वे स्थानक असल्याने अनेक जण येथे उतरतात. तर अनेक प्रवासी हे परिसरातील पंचक्रोशीत राहणारे असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेक जण मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला भागात राहणारे असतात. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी मोठी आहे. त्यामुळे येथील खासगी वाहतूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

यासाठी अनेक चालकांनी या व्यावसायात येत बँकांकडून कर्ज काढून खासगी वाहन चालवत आहे. प्रवासी वाहतूक करीत या कर्जाची परतफेड ते करीत आहे.

परंतु शासनाने महिलांना एसटीने प्रवासासाठी दिलेली पन्नास टक्क्यांची खास सवलत आणि वृद्धांना दिलेली मोफत प्रवासाची सवलत पाहता खासगी वाहनांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.

सध्या एका फेरीसाठी अनेक वेळ प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच मिळणारे पैसेदेखील मिळत नाहीत. निम्म्यापेक्षा कमी व्यवसाय होऊ लागला आहे. शिर्डी, मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड अशा पट्ट्यावर गड्या चालतात.

एका बाजूने प्रवाशी भरले तरी दुसऱ्या बाजूने प्रवाहांची संख्या नगण्य असते. त्यामुळे फेऱ्यांचा संख्या फारच कमी झाली आहे. काही वेळा प्रवाशी मिळत नसल्याने गाडी भरत नाही. महागाईत वाहन दुरुस्ती, देखभाल व इंधन खर्च यांचा बोजा वाढू लागला आहे.

त्यातल्या त्यात कुटुंब चालवणे मोठे कठीण झाले आहे. वाहन चालवण्याची सवय लागल्याने दुसरा व्यवसाय करता येईना अशी स्थिती झाली आहे.

"पूर्वीसारखे प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा पाच सहा प्रवाशांवर गाडी शिर्डीला घेऊन जावी लागते. प्रवासी संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्याचा फटका बसत आहे. त्यातल्या त्यात एसटीने प्रवाशांना तिकीटमध्ये सवलत दिल्याने प्रवासी एसटीने प्रवास करण्यावर भर देत आहे. त्यामुळे गाडी चालवणे तोट्याचे झाले आहे."- अनिस शेख, वाहन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT