agricultural esakal
नाशिक

Agriculture: राज्यातील 26 हजार कोटींची कृषी निविष्ठांची बाजारपेठ संकटात; पाऊस 70 अन खरिपाच्या पेरण्या 47 टक्के

महेंद्र महाजन

Agriculture : राज्यात आजअखेर ७० टक्के पाऊस झाला असून, त्यावर शेतकऱ्यांनी ४७ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. अगोदर मूग, उडीद, ज्वारी, भुईमुगाच्या पेरणीचा प्रश्‍न तयार झाला असताना कापूस लागवडीचा प्रश्‍न नव्याने तयार होणार आहे.

एकूण स्थिती पाहता, बियाणे, खते, रासायनिक औषधे अशा कृषी निविष्ठांची २६ हजार कोटींची राज्यातील बाजारपेठ संकटात सापडली आहे. (State 26 thousand crore agricultural inputs market in crisis Rainfall 70 and kharif sowing 47 percent nashik)

गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत राज्यात १११.५ टक्के पाऊस झाला होता. तसेच, खरिपाच्या ७२.४७ टक्के पेरण्या उरकल्या होत्या. मुळातच, अगोदर मॉन्सूनचे विलंबाने आगमन झाले आणि पावसाने लपंडाव सुरू ठेवला.

राज्याच्या एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र ५८ टक्के आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन आणि कपाशीची लागवड ६३ टक्के झाली. गेल्या वर्षी सोयाबीनची ९१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.

यंदा हीच पेरणी ६१ टक्क्यांवर आहे. कपाशीची लागवड गेल्या वर्षी ८७ टक्के क्षेत्रावर झाली आणि आता ही लागवड ६७ टक्के झाली. हवामानशास्त्र अभ्यासक जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवत आहेत.

म्हणजेच, काय तर पुढच्या पावसावर पिके घ्यायची झाल्यास कीड, रोग, मरचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. १५ जुलैनंतर कापूस आणि सोयाबीनची लागवड करावयाची झाल्यास ३० ते ३५ टक्के उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बियाणे, खतांच्या मागणीचा प्रश्‍न

पेरणीलायक पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे बियाणे आणि खतांच्या मागणीचा प्रश्‍न तयार झाल्याचा सूर दुकानदारांकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचू लागला.

शेतकऱ्यांनी यापुढील काळात घरचे सोयाबीनचे बियाणे वापरल्यास विक्रीसाठी उपलब्ध असलेले बियाणे धान्य म्हणून विकायचे काय, अशा द्विधा मनस्थितीत दुकानदार आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सोयाबीन, कापूस आणि तुरीकडे क्षेत्र वर्ग होण्याची शक्यता आहे.

ही वस्तुस्थिती राहिल्यास विशेषतः तुरीच्या बियाण्यांचा प्रश्‍न राज्यात तयार होणार नाही ना, या चिंतेने कृषी विभागाच्या यंत्रणेला ग्रासले आहे.

दरम्यान, विभागनिहाय आजपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षीच्या ११ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शविते) : कोकण- ८८.९ (११०.७), नाशिक- ६३.३ (१०५.३), पुणे- ४३ (७७.२), छत्रपती संभाजीनगर- ६०.६ (१३५.२), अमरावती- ५६.६ (१०६.२), नागपूर- ७२.५ (१२२.२). सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अकोला जिल्ह्यांत २५ ते ५०, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ५० ते ७५, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत ७५ ते १०० आणि ठाणे, पालघर व गोंदिया जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागनिहाय खरिपाच्या आजअखेरच्या पेरणीची टक्केवारी याप्रमाणे : कोकण- ११, नाशिक- ४१, पुणे- २०, कोल्हापूर- २३, छत्रपती संभाजीनगर-४४, लातूर- ५५, अमरावती- ६५, नागपूर- ४७. मुगाची गेल्या वर्षी ५३ आणि आता १६, उडिदाची गेल्या वर्षी ६६ आणि आता १४, तर ज्वारीची गेल्या वर्षी ३२ व आता १५ टक्के पेरणी झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कृषी विभागाचे आपत्कालीन पीक नियोजन

पेरणीयोग्य पाऊस आगमन कोणती पिके घ्यावीत कोणती पिके घेऊ नयेत

८ ते १५ जुलै सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग व उडीद

कपाशी, तूर, तीळ, सूर्यफूल, भात

१६ ते ३१ जुलै सोयाबीन, मका, बाजरी, तूर, भात कपाशी, ज्वारी, भुईमूग

१ ते १५ ऑगस्ट बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर, हळवा भात कपाशी, ज्वारी, भूईमूग, सोयाबीन

(साधारणतः २० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा, रासायनिक खत वापरात २५ टक्के कपात करावी)

(सोयाबीनची पेरणी शक्यतो २५ जुलैपर्यंत करावी आणि पेरणीसाठी उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे)

(आंतरपीक पद्धतीचा अधिक वापर करावा. सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक घ्यावे. पावसाचा खंड पाहून संरक्षित सिंचन करावे)

२७ टक्के शेतकऱ्यांचा पीकविम्यात सहभाग

पंतप्रधान पीकविमा योजनेतील सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असून, यंदाच्या खरिपासाठी आजअखेर २७.४५ टक्के शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

० विभागनिहाय योजनेतील आजअखेर सहभागी शेतकऱ्यांची संख्या : कोकण- ६.१८, नाशिक- २६.४५, पुणे- २६.५५, कोल्हापूर-४४.९५, छत्रपती संभाजीनगर- ३१.५३, लातूर- २३.५३, अमरावती- ३१.२०, नागपूर- १८.८०

० गेल्या वर्षीच्या खरिपातील अर्जदार शेतकरी संख्या- ९६ लाख ६२ हजार २६१

० कर्जदार शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या- ९ हजार ६५०

० बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या- २६ लाख ४२ हजार ९१८ (एकूण अर्जांची संख्या- २६ लाख ५२ हजार ५६८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT