Dengue Update : शहरात डेंगी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची कानउघाडणी करताना कंटेनर सर्वेक्षण वाढविण्याच्या तसेच कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी रुग्णांची संख्या वाढत आहे. (State Health Departments response to NMC Program to control dengue nashik)
ऑगस्टमध्ये पावणेदोनशेपर्यंत डेंगी रुग्णांची संख्या वाढली. महापालिकेच्या रुग्णालयामार्फत आलेली आकडेवारी असली तरी खासगी रुग्णालयात मात्र मोठ्या प्रमाणात डेंगी रुग्ण उपचार घेत आहेत.
यातून रुग्णांची आर्थिक लूटमार होत असल्याच्यादेखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. डेंगी चाचणी करण्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शनानंतर सहाशे रुपये दर निश्चित केले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीदेखील डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक घेतली. या वेळी महापालिकेकडून आरोग्यमंत्र्यांचीदेखील दिशाभूल करताना चुकीची आकडेवारी देण्यात आल्याची बाब समोर आली.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. बी. खतगावकर यांनी महापालिकेला पत्र पाठवून कानउघाडणी केली आहे.
ठेकेदारांना नोटिसा
आकाश कोरडे असतानादेखील डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने वैद्यकीय विभागाला फैलावर घेतल्यानंतर अपयशाचे खापर ठेकेदारांच्या माथी मारले जात आहे.
वास्तविक धूर व औषध फवारणी होत नसल्याच्या तक्रारी असल्या तरी यास महापालिकेचा मलेरिया विभाग तेवढाच जबाबदार आहे. असे असतानादेखील प्रशासनाकडून मलेरिया विभागावर कारवाई न होता ठेकेदारांना नोटिसा पाठवल्या जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राज्य शासनाच्या सूचना
वाढत्या डेंगी रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवून महापालिकेला सूचना केल्या आहेत.
कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे, जलद ताप सर्वेक्षण करा, रक्तजल नमुने गोळा करावे, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडा, नागरी स्वच्छता अभियान राबवावे, कंटेनर सर्वेक्षण वाढवावे, अतिसंवेदनशील भागात दूर फवारणी वाढवावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, नागरिकांमध्ये जनजागृती करून आवश्यक औषध साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.