Uday Samant esakal
नाशिक

Uday Samant : अक्राळे येथे आयटी हबची उभारणी; राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Uday Samant News : तालुक्यातील अक्राळे व तळेगाव दिंडोरी येथे लवकरच शंभर एकर जागेवर आयटी हब उभारण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात ८१५ हेक्टर जागेचे भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. (State Industry Minister Uday Samants information Construction of IT Hub at Akral nashik)

नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आयटी हबची मागणी होत आहेत. गेल्या २० वर्षांत नवीन प्रकल्प नाशिक शहरात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.

उद्योगमंत्री गुरुवारी (ता. १७) नाशिक दौऱ्यावर आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी भूसंपादनाची गरज ओळखून ८१५ हेक्टर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे शंभर एकर जागेवर पायाभूत सुविधांसह आयटी पार्क आयटी हब उभारण्यात येणार आहे. नाशिकमध्ये नवे उद्योग आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असले, तरी उद्योजकांनी यास समर्थता दर्शविणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कारण उद्योगमंत्री म्हणून नवे उद्योग आणणे माझ्या हाती आहे. मात्र, आपला उद्योग कुठे उभारायचा याचा सर्वस्वी अधिकार उद्योजकांचा असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

नाशिकमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ट्रक टर्मिनलबाबत प्रयत्न सुरू आहेत. अधिवेशनात उद्योजकांच्या सुलभतेसाठी मैत्रीसारखा कायदा आणल्याने परवानग्या सुलभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर राज्यातील लघु उद्योगांना सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या इन्सेन्टिव्हचे वाटप केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT