Sahil Parikh esakal
नाशिक

State Level Invitational Cricket Tournament : सुपर लीगसाठी साहिल पारख कर्णधार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट सुपर लीग स्‍पर्धा पुणे येथे खेळविली जाणार आहे. उद्या (ता.४) पासून या स्‍पर्धेला सुरवात होत आहे. स्पर्धेत डावखुरा सलामीवीर साहिल पारख नाशिक जिल्हा संघाचे नेतृत्व करणार आहे. जिल्‍हा संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. (State Level Invitational Cricket Tournament Sahil Parakh Captain for Super League Nashik Latest Marathi News)

१६ संघातील ४ गटात ही स्पर्धा होईल. मे व जूनमध्ये नाशिक येथे सहा संघांच्या झालेल्या आमंत्रितांच्या साखळी स्पर्धेचे गट विजेतेपद नाशिकने पटकावले होते. पाच साखळी सामन्यांत २ निर्णायक विजय व ३ पहिल्या डावातील आघाडीचे गुण अशी प्रभावी कामगिरी नाशिक जिल्हा संघाने केली होती. त्यामुळेच सुपर लीगच्या फेरीसाठी नाशिकचा संघ पात्र ठरला होता.

नाशिकचा समावेश असलेल्या ब गटात आर्यन्स पुणे, अॅमबीशियस पुणे, एम सी ए ११ या अन्‍य तीन संघांचा समावेश आहे. दोन दिवसीय कसोटी सामन्याच्या स्वरूपात खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील नाशिकचे सामने उद्या (ता.४) तसेच ७ आणि ११ सप्टेंबरला अनुक्रमे आर्यन्स पुणे, अॅमबीशियस पुणे, एमसीए ११ या संघांबरोबर होणार आहेत.

नाशिकच्‍या संघात साहिल पारख (कर्णधार) , लक्ष रामचंदानी (उपकर्णधार) , साई राठोड, दीर्घ ब्रह्मेचा, सिद्धार्थ काकड, साहिल बर्वे , सोहम तमखाने, समकीत सुराणा, हुजैफ शेख, वेद सोनवणे, करण कातकाडे, जीशान खान, कृष्णा केदार आणि किरण फडोळ यांचा समावेश आहे.

तर गर्व रावत, नील चंद्रात्रे, प्रणव येवले व विदूर मौले हे राखीव खेळाडू आहेत. सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फय्याज गंजीफ्रॉकवाला यांच्या निवड समितीने खेळाडूंची निवड केली. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडूंना शुभेच्‍छा दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT