जुने नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे डिसेंबर महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संघर्ष एसटी कामगार युनियनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर या आशियाचा फलकदेखील झळकलेला दिसून आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या यापूर्वीही आशाच प्रकारे वेतन रखडले होते. या संदर्भात कामगारांकडून मुंबई येथे औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्णय होत नाही, तोपर्यंत कामगारांचे वेतन नियमित अदा करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. (State Transport Corporation Protests by sketching billboards due to unpaid wages Nashik News)
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
असे असताना जानेवारी महिन्याची १२ तारीख लोटली असूनही अद्याप डिसेंबर २०२२ चे वेतन मिळालेले नाही. असे करून महामंडळाकडून न्यायालयाचा अवमान केला जात असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.
त्यांच्या या कृतीचा संघर्ष एसटी कामगार युनियनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध व्यक्त करणारा फलकदेखील एनडी पटेल रोड येथील कार्यालयाबाहेर लावण्यात आला आहे. कामगारांची मानसिक स्थिती प्रचंड बिघडली आहे. लवकरात लवकर डिसेंबर महिन्याचे वेतन देण्यात यावे. तसेच, यापुढेही नियमित वेतन अदा केले जावे, अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.