नाशिक : महसुली खर्च 35 टक्क्यांच्यावर जात असल्याने महापालिकेत आस्थापनेवरील रिक्त पदे भरता येत नाही. मात्र असे असले तरी 'फिक्स पे' (Fix pay) वर कर्मचारी भरती करण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असले, तरी कोविडच्या (Corona virus) पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य व वैद्यकीय विभाग वगळता अन्य कुठल्याही विभागात भरती न करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने 'फिक्स' पे वर भरती करण्याचा सत्ताधारी भाजप ने केलेला प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (stay-on-fix-pay-employment-in-nashik-municipal-corporation-marathi-news)
प्रशासनाने घेतला राज्य शासनाच्या अध्यादेशाचा आधार
नाशिक महापालिकेचा 'क' वर्ग संवर्गात समावेश होता, परंतु राज्य शासनाने वाढती लोकसंख्या व महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन 'ब' वर्गात समावेश केला. 'क' वर्गात ७०८२ पदे मंजूर आहेत. मात्र विविध कारणांमुळे ३०३५ पदे रिक्त झाली असून सध्या चार हजार ६८२ पदे कार्यरत आहे. मात्र 'ब' वर्ग आकृतीबंधानुसार शासनाकडे चौदा हजार पदांचा आकृतीबंध सादर केला आहे. तो आकृतीबंध अद्यापही शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वी मंजूर असलेल्या आकृतीबंधातील रिक्त पदे भरण्याची मागणी महासभेत करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने राज्य शासनाच्या एका अध्यादेशाचा आधार घेत 35 टक्क्यांच्या वर महसुली खर्च जात असेल तर भरती करता येत नसल्याचे स्पष्ट पणे सांगितले होते.
भाजपचा फुटला फुगा
त्यानुसार महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन फिक्स पेवर भरती करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापौरांनी आदेशित करून चोवीस तास उलटत नाही तोच प्रशासनाने पुन्हा एकदा शासनाच्या अध्यादेशाचा आधार घेत भरती करता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने सत्ताधारी भाजपचा फीक्स पेवर भरती करण्याचा फुगा फुटला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २४ जूनला रिक्त पदांच्या भरती बाबत एक अध्यादेश काढला आहे. त्यात अत्यावश्यक म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग वगळता अन्य कुठल्याही विभागात भरती करू नये असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे फिक्स पे वर महापालिकेत भरती करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिक्त पदांवरही फुली
राज्यशासनाने अत्यावश्यक भाग म्हणून नवीन आकृतीबंधातील ६४५ व पूर्वीच्या आकृतीबंधातील ४१७ अशा एकूण १०५२ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये वैद्यकीय विभागातील ३११ अग्निशमन विभागातील ५१८ तर बांधकाम विभागातील तांत्रिक २२३ पदे भरण्याचा समावेश होता. मात्र शासनाने २४ जून २०२१ रोजी काढलेल्या आदेशात पदभरती करताना निर्बंध लागू केल्याने वैद्यकीय वगळता ७४१ पदांची ही भरती करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
(stay-on-fix-pay-employment-in-nashik-municipal-corporation-marathi-news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.