Stray Dogs esakal
नाशिक

Dogs Sterilization : वर्षभरात सव्वानऊ हजार श्वानांचे निर्बीजीकरण; 60 लाखांहून अधिक खर्च

सकाळ वृत्तसेवा

Dogs Sterilization : शहरात २००७ पासून श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू झाली असून, दरवर्षी सरासरी सहा हजार श्वानांचे निर्बीजीकरण होऊन संख्येवर नियंत्रण येत नसल्याची बाब समोर आली आहे.

या वर्षी ८ एप्रिलला ठेक्याची मुदत संपुष्टात आली. त्यात वर्षभरात ९२७९ श्वान निर्बीजीकरण झाल्याची समोर आले आहे. निर्बीजीकरणासाठी वर्षभरात ६० लाख ३१ हजार रुपये खर्च झाले आहे. (Sterilization of seventy nine thousand dogs in year Expenditure of more than 60 lakh nashik nmc news)

न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये श्वान निर्बीजीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीमध्ये २००७-०८ पासून श्वान निर्बीजीकरण सुरू करण्यात आले आहे.

निर्बीजीकरणानंतर श्वान संख्या कमी होणे अपेक्षित असताना अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पंधरा वर्षात सरासरी सहा हजार श्वानांचे दरवर्षी निर्बीजीकरण केले जाते. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ९२७९ श्वान निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

त्यासाठी ६० लाख ३१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एका श्वान निर्बीजीकरणासाठी साडेसहाशे रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. साडेचार हजार नर, तर ४७७९ मादी पकडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

नवीन श्वान निर्बीजीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मागील वर्षीचे कंत्राट शरण वेल्फेअर सोसायटीला देण्यात आले होते. भटक्या श्वानांना पकडून विल्होळी जकात नाका येथील जागेत आणणे व शस्त्रक्रिया करणे, शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसानंतर जेथून श्वान पकडले तेथे सोडणे बंधनकारक आहे.

अशी आहे श्वान निर्बीजीकरण स्थिती

वर्ष निर्बीजीकरणाची संख्या

२००७-०८ १७४९

२००८-०९ ४४५७

२००९-१० ८३७४

२०१०-११ ९६१६

२०११-१२ १०,१४८

२०१२-१३ २८०१

२०१३-१४ ६७११

२०१४-१५ ६८०३

२०१५-१६ ६३१४

२०१६-१७ ६४६०

२०१७-१८ ८८९७

२०१८-१९ ७८५२

२०२०-२१ ६१८७

२०२१-२२ ७९८८

२०२२-२३ ९२७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Suraj Chavan & Janhavi Killekar : सूरज चव्हाणच्या गावी रमली जान्हवी, गावातल्या शेतात मारला फेरफटका

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Latest Marathi News Updates live: मविआकडून बीकेसीच्या सभेत पंचसुत्री जाहीर

SCROLL FOR NEXT