stock of adulterated milk worth Rs 48000 seized in niphad nashik adulteration news esakal
नाशिक

Adulterated Milk : भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adulterated Milk : निफाड येथील बोकडदरे शिवारात अंकुश वसंतराव कातकाडे यांच्या घरी नाशिक अन्न व औषध प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलिस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत भेसळयुक्त दुधाचा ४८ हजार १६४ रुपयांचा साठा जप्त केला.

भेसळयुक्त पदार्थांपैकी हेमंत पवार (शहा, पंचाळे, ता. सिन्नर) यांनी दूध पावडरचा व सिन्नर, माळेगाव येथील मोहन आरोटे यांनी तेलसदृश पदार्थाचा पुरवठा केला असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे सदर विक्रेते व पुरवठादार यांच्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यान्वये तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (stock of adulterated milk worth Rs 48000 seized in niphad nashik adulteration news)

कारवाईत डेअरी परमिट पावडर १६ किलो (किंमत २,२४० रुपये), व्होल मिल्क पावडर ३२ किलो (किंमत ७,६८० रुपये), तेलसदृश पदार्थ १६८ लिटर (किंमत २५,७०४ रुपये) व भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर (किंमत १२ हजार ५४० रुपये) असा एकूण ४८ हजार १६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त गाय दूध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने मानवी सेवनास येऊ नये, या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले.

कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासानाने माहिती देताना सांगितले, की गोपनीय माहिती मिळाल्यावर अंकुश कातकाडे यांचे राहते घर, कातकाडे मळा, गट क्रमांक ३१/१/ब/२, बोकडदरे शिवार, ता. निफाड, जि. नाशिक येथे तपासणी केली असता सदर ठिकाणी एक व्यक्ती दुधाच्या प्लास्टिक कॅनमध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पंचांसमक्ष सदर परिसराची झाडाझडती घेतली असता सदर ठिकाणी डेअरी परमिट पावडर १६ किलो, व्होल मिल्क पावडर ३२ किलो, तेलसदृश पदार्थ १६८ लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४१८ लिटर गाय दुधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले.

ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी व योगेश देशमुख यांनी विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे व सहाय्यक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईत विशेष पथक, नाशिक ग्रामीण व निफाड पोलिस ठाण्याचे पथक यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT