savitri.jpg 
नाशिक

"पती व्यसनाच्या आहारी..सतत छळ..तरीही सात जन्म 'तिला' हाच पती हवा..!" 

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / चांदवड : पती व्यसनाच्या आहारी गेलेला. लग्नानंतर अठ्ठावीस वर्षे सतत छळ करणारा पती.. घरात अठरा विश्व दारिद्रय.. नशीबी कायमच मोलमजुरी तरीही पतीवर तितकेच प्रेम अन् हाच पती सात जन्म मिळावा.तो सुखी रहावा म्हणून गेली सत्तावीस वर्षे वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करणारी आधुनिक सावित्री पाहिली की मन गहिवरून येते. हि कहाणी आहे निमोण या.चांदवड येथील सेहचाळीस वय असलेल्या शोभा उगले यांची.अशा असंख्य सावित्री आज पतीचा त्रास असतानाही संसार करतात त्या केवळ पतीच्या सुखासाठी.. मुलांच्या भल्यासाठी धडपडत आहेत.

असंख्य थपेड़े सह कर भी
अनवरत जारी हूं ....
कर लूं गर मैं दृढ़ निश्चय
तो यमराज पर भी भारी हूं ।
मैं नारी हूं....
.

भोळी भाबडी तिची माया..तू पण समजून घे पतीराया
वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. या व्रताने पतीवरील संकटे दूर जातात आणि पतीला दिर्घआयुष्य लाभते. या व्रताने वैवाहिक जीवनातील अडीअडचणी ही दूर होतात. याच धारणेतून शोभा उगले दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करतात.

अन् सुखी संसाराला दृष्ट लागली

निफाड तालुक्यातील माहेर असलेल्या शोभा यांचं सत्तावीस वर्षांपूर्वी निमोण येथील एका तरूणाशी विवाह झाला. सुखी संसाराची स्वप्ने पाहत उंबरठा ओलांडला.. खरा काही दिवस अगदी सुखाने संसार चालला. त्यांच्या संसारवेलीवर तीन मुली व एक मुलाच्या रुपाने सुंदर फुले उमलली. काही दिवसांनी मात्र पती व्यसनाच्या आहारी गेला अन् सुखी संसाराला दृष्ट लागली.पतीचं रोजचाच छळ पुढे सुरू झाला.तरीही या पतीव्रतेने आई वडिलांना आपल्या भावांना कधी सांगितले नाही.आई वडीलांचे नाव मोठं करण्यासाठी दररोज मोलमजुरी करायची मुलांना सांभाळायचं अन् पतीचा मार खायचां हे नित्याचेच.घरची दोन एकर कोरडवाहू शेती त्यातुन कधीच काही पिकलं नाही. मोलमजुरी करून भावांच्या मदतीने तिन्ही मुलींचं लग्न केले.आता मुलगा मनमाड ला एका दुकानात पाच हजार रुपये महिन्यने काम करीत आईला हातभार लावत आहे.हि सावित्री आपल्या एकुलत्या एक मुलासाठी सगळं सहन करीत त्याच्या पाठीशी उभी राहत पतीलाही सांभाळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT