street vendors  esakal
नाशिक

नाशिक : फेरीवाल्यांनी सेंट्रल मार्केटच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करावे

.युनूस शेख

जुने नाशिक : रमजाननिमित्त शेवटचे दोन ते तीन दिवस विविध प्रकारच्या व्यावसायिक रस्त्यावर व्यवसाय करतात. त्यांनी तसे न करता सेंट्रल मार्केटच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करावे. मार्केटच्या पदाधिकाऱ्‍यांकडून व्यावसायिकांना मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय अन्य प्रकारची मदतदेखील केली जाईल, अशा आशयाचे निवेदन नाशिक सेंटर मार्केटच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्त (NMC Commissioner) तसेच पोलिस आयुक्तांना (Police Commissioner) देण्यात आले आहे.

रमजान ईदच्या (Ramzan Eid) आदल्या दोन ते तीन दिवस मुस्लिम (Muslim) बांधवांची विविध प्रकारच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बहुतांशी फेरीवाले या दिवसात दूध बाजार ते भद्रकाली जुने टॅक्सी स्टॅन्ड पर्यंत रस्त्यावर व्यवसाय थाटत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असतो. या समस्यांचा विचार करता नाशिक सेंट्रल मार्केटतर्फे (Nashik Central Market) रस्त्यावरील व्यवसायिकांना मार्केटची प्रशस्त आणि मोकळी जागा व्यावसायासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांनी रस्त्यावर गर्दी न करता या ठिकाणी व्यवसाय करावे. जेणेकरून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पायी ये-जा करणाऱ्‍या नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर सेंट्रल मार्केट येथील हॉकर्स झोनचा (Hawkers Zone) विकास होण्यास मदत होईल. यानिमित्त व्यवसायिकांना नाशिक सेंटर मालकीच्या जागेत व्यवसाय करण्यास सांगण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका (NMC) आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे.

"सेंट्रल मार्केटच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करण्याची सवय लागल्यास भविष्यात या व्यावसायिकांचा विकास होण्यास मदत होईल. शेवटच्या चार पाच दिवसात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मार्केटतर्फे संरक्षणदेखील देण्यात येईल."

- चेतन शेलार, नाशिक सेंट्रल मार्केट अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT