Nashik News : मी अमुक..अमुक बोलतोय. तुम्हाला अधीक्षक अभियंता किंवा एखाद्या मोठ्या पदावर बसायचे आहे का, जर बसायचे असेल तर तुम्हाला या अटी व शर्ती (आर्थिक) पाळाव्या लागतील.
काम करायचे असेल तर तत्काळ सांगा, या चार ते पाच अभियंत्यांना आलेल्या दूरध्वनीने महापालिका मुख्यालयात मंगळवारी (ता. ३) खळबळ उडाली.
यासंदर्भात बोलण्यास अभियंत्यांनी नकार दिला असला तरी दबक्या आवाजातील चर्चा अभियंत्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दर्शवीत होती. (Stress on face of engineers with call Excitement at Headquarters Telephonic offer for post of Superintending Engineer Nashik)
महापालिकेत अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. रिक्त पदांची भरती करण्यास शासनाने बंदी आणली आहे. महापालिकेचा महसुली खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणल्यास भरती शक्य आहे.
परंतु सातवा वेतन आयोग व अन्य खर्चामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च कमी होत नाही. त्यामुळे रिक्त पदांची भरती करता येत नाही. दर महिन्याला अभियंता सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे अभियंत्यांवर कामाचा भारदेखील वाढला आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस मलनिस्सारण, यांत्रिकी, विद्युत, पाणीपुरवठा या चार विभागांचा पदभार सांभाळणारे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर नियुक्ती करणे बंधनकारक आहे.
एकाच अधिकाऱ्याकडे चार प्रमुख विभागांचा कार्यभार असल्याने या चारही विभागांचे विभाजन करून स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा होती.
दुसरीकडे पुणे प्राधिकरणाकडे यापूर्वी रुजू झालेले प्रशांत पगार महापालिकेत पुन्हा रुजू झाले आहेत. त्यामळे महापालिकेच्या अभियंता संवर्गात मोठ्या प्रमाणात फेरबदल होतील, अशी चर्चा असतानाच पाच दिवसांच्या सुटीनंतर नियमित कामकाज सुरू झालेल्या महापालिका मुख्यालयात अभियंत्यांना वेगळाच धक्का बसला.
सोमवारी दिवसभरात चार ते पाच अभियंत्यांना अधीक्षक अभियंता पदासाठी दूरध्वनीवरून ऑफर आल्याची चर्चा होती. त्यात अमुक..तमुक अधिकाऱ्याशी संबंध असल्याने तुमचे काम आम्ही करून त्यासाठी अटी व शर्ती टाकण्यात आल्याची चर्चा होती. यासंदर्भात वरिष्ठांनी कानावर हात ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.