नाशिक / चांदवड : नोकरी गेल्याचे दु:ख जोपासले असते, तर आजच्या संकटकाळात हतबल होऊन चार पैसे कमावण्यासाठी जिवाचे रान करावे लागले असते. परंतु वेळीच निर्णय घेऊन संघर्षातूनच धडा घेत, स्वत:चा उद्योग सुरू केल्याने कुटुंबाला आधार देतानाच संकटकाळातही आपण खंबीरपणे उभे राहू शकतो, याचा प्रत्यय शिंगवे (ता. चांदवड) येथील मनोहर आहेर यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
संघर्षावर कशी केली मात?
पदवीधर असलेले मनोहर आहेर 2008 पासून नांदगाव तालुक्यात एका खासगी शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत होते. तीन वर्षे नोकरी केली. त्याच काळात लग्न झाले. मात्र, संस्थेने नोकरीवरून काढून टाकले. न्यायालयीन लढाईतही हार पत्करावी लागली. एक मुलगा व एक मुलगी यांच्या रूपाने कुटुंबातील सदस्यही वाढले. उपजीविकेसाठी दुसरीकडे नोकरीचा शोध सुरूच होता.
अशा काळात पत्नीने दिला धीर
मनमाडपासून अवघ्या दोन किलोमीटरवर वस्ती. घरची दहा एकर शेती; मात्र सततची नापिकी. घरात कर्ता पुरुष असल्याने प्रचंड निराशा अन् सततची चिंता. अशा काळात पत्नी सविताने धीर दिला. मित्रांनी म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यातून या व्यवसायाची माहिती घेतली खरी; पण हाती भांडवल म्हणून केवळ 30 हजार रुपये शिल्लक होते. तरीही ठामपणे या व्यवसायात उतरण्याचा निश्चय केला. मित्र- नातेवाइकांकडून हातउसने आणखी पन्नास हजार रुपये घेतले. सुरवातीला दोन म्हशी घेऊन व्यवसाय सुरू केला. कारकुनी करताना पेन धरायची सवय अन् आता म्हशीची धार, गोठ्यातलं शेण काढणं सुरवातीला जरा अडचणीचं वाटलं. पण, दूधविक्रीतून पैसा दिसू लागल्याने धंद्याची गोडी वाढली. बघता बघता वर्षभरात म्हशींची संख्या दहावर पोचली. रोज सकाळी व सायंकाळी 85 लिटर ताजे दूध विकणे शक्य झाल्याने उत्पन्नही वाढले अन् त्यातून कुटुंबाला स्थैर्यही लाभले.
हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!
आहेर कुटुंबाचा दिनक्रम
दहा म्हशी सांभाळताना आहेर दांपत्याचा दिवस पहाटे चारपासून सुरू होतो. सर्वप्रथम गोठ्यातलं शेण काढून गोठा साफ करणे, नंतर सकाळी सहापर्यंत दूध काढणे, म्हशींना चारापाणी. दुपारी पुन्हा चार ते सातपर्यंत हाच नित्यक्रम. रोज सकाळी व सायंकाळी मनमाडला जाऊन दुधाची विक्री करणे, असा आता त्यांचा दिनक्रम झाला आहे.
हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क
बेरोजगारीने होरपळल्यानंतर या व्यवसायाला सुरवात केली. आता मी खूप समाधानी आहे. इतर तरुणांनीही नोकरीच्या शोधात वेळ वाया न घालवता हा व्यवसाय करायला हवा. -मनोहर आहेर, शिंगवे (ता. चांदवड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.