Chhagan Bhujbal esakal
नाशिक

कोरोना परिस्थितीशी झगडत विकासकामे सुरू : पालकमंत्री भुजबळ

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : कोरोनाचे (Corona virus) संकट असल्याने विकासकामांवर काही मर्यादा येत होत्या. त्याचबरोबर अतिवृष्टीसह अनेक संकटे राज्यावर आली आहेत. या परिस्थितीतूनही मार्ग काढत शासनाच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी विकासकामांमध्ये लक्ष घालून ही कामे पूर्णत्वास आणावीत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला मतदारसंघांतर्गत निफाड तालुक्यातील ४२ गावांच्या परिसरात शुक्रवारी (ता. ६) पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास, ठक्कर बाप्पा, समाज कल्याण, जिल्हा क्रीडा, ग्राम निधी, जिल्हा नियोजन, मुलभूत सुविधा, जनसुविधा, आमदार निधी, सार्वजनिक बांधकाम यासह विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी २७ लाख ५० रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती

ना. भुजबळ म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून, ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांनी अविरतपणे काम करत अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. शेतकऱ्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कोरोना काळात राज्यात ५५ हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ८.५ लाख टनाहून अधिक अन्न-धान्याचे वाटप करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करण्यात आल्याचे ना. भुजबळ यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विकासकामे ठप्प असतांना देखील येवला मतदारसंघात विकासाची कामे अविरत सुरू आहेत.

या वेळी मुंबई बाजार समितीचे संचालक सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, ब्राह्मणगावचे सरपंच प्र. वि. चौधरी, उन्मेश डुंबरे, अनुप वनसे, सरपंच दत्तात्रय डुकरे, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, येवला पंचायत समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नंदूशेठ डागा, ज्ञानेश्‍वर शेवाळे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, बबन शिंदे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उपअभियंता ए. पी. गोसावी, गटविकास अधिकारी संदिप कराड, उपअभियंता आर. ए. फारुखी आदी उपस्थित होते.

(struggling with Corona situation development work begins Guardian Minister Bhujbal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT