Students and parents taking Aadhaar card impressions at Bholenath Computer and Aadhaar Centre esakal
नाशिक

Nashik News : विद्यार्थी आधार कार्ड खरी परीक्षा शिक्षकांची? तांत्रिक अडचणींमुळे रिजेक्ट

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व आधार अद्ययावत पूर्ण करावयाचे आहे.

आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची पदे व विद्यार्थी लाभाच्या योजना १ जानेवारी २०२३ पासून देय होणार आहे. त्यामुळे सर्वत्र गेल्या महिनाभरापासून उर्वरित विद्यार्थी आधार जोडणीसाठी शिक्षकांची दमछाक होत आहे.

मात्र आधार कार्ड नोंदणी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे भरलेले फॉर्म रद्द होत असल्याने शिक्षकांची आता खरी परीक्षा सुर झाली आहे. या कामामुळे शिक्षकांना अध्यापनाचे काम सोडून आधारकार्डसाठी पालक व आधार सेंटर अशा चकरा मारण्याची वेळ आली आहे. (Student Aadhaar Card problematic for teachers Rejected due to technical difficulties Nashik News)

जिल्ह्यात १३ लाख १४ हजार ४२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आधार कार्ड काढलेले विद्यार्थी १२ लाख ९३ हजार ४२३ असून २१ हजार विद्यार्थी अजूनही आधारकार्ड पासून वंचित आहेत. जिल्ह्याचे ९८.४० टक्के आधार पूर्ण झाले आहे.

शाळांमध्ये विद्यार्थी आधार नोंदणी दिलेल्या मुदतीत पोर्टलवर नोंदणीकृत न झाल्यास, लाभाच्या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर असल्याचे पत्र प्रशासनाने काढले आहे.

आधार कार्ड अपडेट सुविधा स्थानिक पातळीवर नसल्याने त्यासाठी पालकांना रोजगार बुडवून बाहेरगावी जावे लागते. नवीन नोंदणी किंवा डेटा अपडेट या दोन्हींमध्ये पालकांची उदासीनता दिसत आहे. यातच फी, फोटो, फॉर्म भरणे असा साधारण: दोनशे ते तीनशे रुपये खर्च होत आहे.

या प्रक्रियेतील पालकांचे अज्ञान, मोबाईल नंबर, ओटीपी सारख्या येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांसह शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यातच आता विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड मध्ये वारंवार चूक होत असून त्यामुळे होणाऱ्या रिजेक्शनला शिक्षकही कंटाळले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

तालुकानिहाय विद्यार्थी आधारकार्ड

तालुका विद्यार्थी संख्या आधारकार्ड काढलेले आधारकार्ड नसलेले

बागलाण ८१७७४ ८११४९ ६२५

चांदवड ४६२७२ ४६०२२

२५०

देवळा ३२२३२ ३१६८७ ५४५

कळवण ४३४७० ४२६८० ७९०

दिंडोरी ७१३०० ७०७६४ ५३६

इगतपुरी ५१९४९ ५१३०१ ६४८

मालेगाव ९२३२१ ९०५२५ १७९६

नांदगाव ६०१३१ ५९५५३ ५७८

मालेगाव शहर १३९८८३ १३३९१३. ६०७०

नाशिक ५९९३९ ५८५८३ ७५६

नाशिक शहर १ १६०२२८ १५७९८४ २२४४

नाशिक शहर २ १४०८५३ १३८५४८ २३०५

निफाड ९९६४७ ९९००० ६४७

पेठ २७८४८ २७६६५ १८३

सिन्नर ७०४३३ ६९४१० १०२३

सुरगाणा ३९९३७ ३८३१७ ६२०

त्र्यंबकेश्वर ३९४४४ ३८८८२ ५६२

येवला ५८३६२ ५७५४० ८२२

दोन आधारकार्ड डोकेदुखी

पाच वर्षाच्या आतील मुलाचे आधारकार्ड काढताना त्याचे बोटांचे ठसे मशिनद्वारे घेतले जात नाहीत. त्यावेळी बोटांचे ठसे न घेता आधार काढले जाते. त्या मुलाला इयत्ता पहिलीत दाखल करतात. या विद्यार्थ्यांचे आधार सरलला अपडेट करतो.

कालांतराने विद्यार्थी दुसरीला किंवा तिसरीला शाळा सोडून बाहेरगावी गेला. तेथील शिक्षक त्याला नवीन आधारकार्ड काढून इयत्ता पहिलीपासून नवीन प्रवेश दिल्याच्याही अनेक बाबी समोर येतात. म्हणजे एकाच मुलाचे वेगवेगळ्या नंबरचे दोन आधारकार्ड काढलेले आहेत.

"कार्ड काढून घेणे हे शिक्षकांचे काम आहे असे पालक सांगतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर बसतोच पण वेळही खूप जातो. प्रशासन मात्र शंभर टक्के आधारकार्ड हवेत म्हणून सारखे पत्र काढत आहे. मात्र अडचणी खूप आहेत. आधारकार्ड अभावी विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहिल्यास शिक्षक जबाबदार त्यामुळे पालकांचा व प्रशासनाचा रोष मात्र शिक्षकावर येतो."

- सुनील धोंडगे, शिक्षक, आडाचीवाडी

"आधारकार्ड नोंदणीत जुना मोबाईल नंबर व ओटीपी अडसर ठरत आहेत. मुळात अनेक पालकांनी आधारकार्ड नोंदणी करून पावती घेतली आहे. पण तत्कालीन मोबाईल नंबर बदलल्याने ओटीपीची अडचण झाली. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी रिजेक्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा नोंदणी करून घेण्यासाठी नव्याने प्रोसेस करावी लागते. याचा पालक व शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो." - पंकज सोनवणे, संचालक भोलेनाथ कॉम्प्युटर चंदनपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT