नाशिक : जेल रोड परिसरातील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी संबंधित शिक्षकासह मुख्याध्यापिकेस चोवीस तासात खुलासा करा, अन्यथा कारवाई करण्याची तंबी दिली आहे. (Student beaten by NMC teacher Clarification sought by education authorities Nashik News)
दरम्यान, संबंधीत शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांच्याबाबत यापूर्वीही पालकांनी, विद्यार्थ्यांना मारहाण करणे, अरेरावी करणे अशा अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मंगळवारी (ता. २८) कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याचे सवंगड्यांशी भांडण सुरू होते.
हा वाद सोडविण्याऐवजी गायकवाड यांनी कर्ण यास बेदम मारले. त्याच्या गालावर मारल्याचे निशाण उमटले होते. विशेषतः ही घटना मुख्याध्यापिका हेमलता मोहिते यांच्या दालनासमोरच घडली.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांनी शिक्षक गायकवाड व मुख्याध्यापिका मोहिते यांना कारवाईची नोटीस दिली असून, २४ तासात खुलासा करण्यास सांगितले आहे.
"मुख्याध्यापिका मोहिते व शिक्षक गायकवाड यांना विद्यार्थी मारहाण प्रकरणी नोटीस बजावली आहे. चोवीस तासात खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल."
-सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, मनपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.