नाशिक : चोळमुख (ता.पेठ) येथील आश्रमशाळेत शिकत असलेल्या १६ वर्षीय आदिवासी विद्यार्थीनीने वसतीगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
भारती महादू गायकवाड असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे. शनिवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली. जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. (student of government ashram school committed suicide by hanging herself in school nashik Latest marathi news)
चोळमुख येथे आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या भारती महादू गायकवाड हिने शनिवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास शाळेच्या वसतीगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
सकाळच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थीनींच्या आत्महत्येची घटना समजताच नाशिक प्रकल्प कार्यालयातर्फे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीसाठी पथक शाळेवर पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान या विद्यार्थीनींच्या आत्महत्येस शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक हेच जबाबदार असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी गणेश गवळी यांच्याकडून केला जात आहे.
मुख्याध्यापक, अधीक्षक हे शाळेत विद्यार्थ्यांकडून शिक्षणाशिवाय इतर कामे करुन घेत असल्याची तक्रार देखील संघटनेच्यावतीने सातत्याने प्रकल्प कार्यालय, अपर आदिवासी आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती.
मुख्याध्यापकांविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची चौकशी करण्याच्या सूचना देखील अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रकल्प कार्यालयास देण्यात आल्या होत्या. जागतिक आदिवासी दिन हा अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाच आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने गळफास घेत केलेली आत्महत्या ही सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.