Menstruation latest marathi news esakal
नाशिक

‘मासिक पाळी’मुळे वृक्षारोपणापासून विद्यार्थिनीस रोखले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मासिक पाळी (Menstruation) आली असल्याचे कारणातून आश्रमशाळेच्या (Ashram school) शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा आरोप देवगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेकडे केल्यानंतर संघटनेच्या वतीने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त यांच्याकडे केली.

या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून देखील घेण्यात आली असून, या प्रकरणी कारवाई करत अहवाल आयोगास सादर करण्याची सूचना केली आहे. (student prevented from planting trees due to menstruation nashik latest marathi news)

देवगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे आदिवासी विकास विभागाची मुलींची स्वतंत्र शासकीय कन्या आश्रमशाळा आहे. शाळेच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला होता.

त्या वेळी शाळेत बारावीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी ही इतर विद्यार्थिनींबरोबर वृक्षारोपण करण्यास गेली असता, शिक्षकांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात विचारणा केली असता, संबंधित विद्यार्थिनीने मासिक पाळी आली असल्याचे सांगितले.

त्यावर शिक्षकांनी मासिक पाळीदरम्यान रोपटे लावल्यास संबंधित रोपटे हे मृत पावते. मागील वर्षीदेखील अनेक झाडे मृत झाल्याचा दाखला दिला. संबंधित विद्यार्थिनीस वृक्षारोपण करण्यापासून रोखले.

संबंधित विद्यार्थिनीने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी यांना सांगितला. त्यानंतर मंगळवारी (ता. २६) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विद्यार्थिनीने अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार केली. त्यानंतर संघटनेच्या वतीने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य महिला आयोगाकडून दखल

या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संदर्भात आदिवासी आयुक्त यांना पत्र देत संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे, तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आदिवासी विभागाच्या आयुक्तांबरोबरच पोलिस अधीक्षक, तसेच महिला व बाल विकासच्या विभागीय आयुक्तांनाही पत्र पाठविले आहे. यात आश्रमशाळेत घडलेली घटना निंदनीय असून, पुरोगामी महाराष्ट्रात एका शिक्षकाकडून अंधश्रद्धेस खतपाणी घालून मुलींच्या नैसर्गिक धर्माबाबत न्यूनगंड निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

"विद्यार्थिनीस शिक्षकांनी वृक्षारोपणापासून रोखल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी प्रकल्प अधिकारी यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करत अहवाल अपर आयुक्त कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई केली जाईल." - संदीप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक

"स्त्रीला मासिक पाळी आली असताना झाड लावल्यास झाडाची वाढ होत नाही अथवा ते जळून जाते, असे समजणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे जसे घटनेत कर्तव्य सांगितले आहे, तसे शिक्षणाच्या गाभा घटकातसुद्धा त्याची नोंद आहे. शिक्षकाचे सदरचे कृत्य हे त्या विरोधात असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी."

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT