Nashik News : कर्तव्यांशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत आणि चांगले काम केले, की त्याची कदर होतेच...शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानासारखे पवित्र कार्य प्रामाणिकपणे केले तर ग्रामस्थच नव्हे तर विद्यार्थीही जाणीव ठेवतातच, याचा प्रत्यय आला तो अंगुलगाव येथील भवानी टेकडी जिल्हा परिषद वस्ती शाळेत...गेली चौदा वर्ष विद्यार्थी घडविणाऱ्या समाधान शिंदे सरांची बदली झाली आणि निरोप देताना गावकरी भावूक झाले.
विद्यार्थीही टाहो फोडताना डोळ्यातून अक्षरशः पाणी तरळल्याचा हृदयद्रावक प्रसंग आज पहावयास मिळाला. (students of Bhawani Tekdi zp Vasti School were emotional at farewell of teacher Samadhan Shinde nashik news)
अंगुलगाव येथील भवानी टेकडी जिल्हा परिषद वस्ती शाळेत १४ वर्ष सेवा दिल्यानंतर शिंदे यांची बदली झाली. ग्रामस्थांनी आज एकत्र येऊन गुरुजींना निरोप दिला.
१४ वर्ष या माणसाने आपल्या गावापासून ४०० किलोमीटर दूरवर येऊन काम करत असताना शाळेतील विद्यार्थी हेच माझे दैवत हा एक ध्यास घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपला लेक म्हणून शिकवणाऱ्या व मायेने काळजी घेतल्याने विद्यार्थ्यांना देखील गुरुजीचा लळा लागला होता, म्हणूनच निरोप देताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी येत होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
हुंदका देऊन रडणारे विद्यार्थी व भावूक झालेले ग्रामस्थ...असा प्रसंग कधीतरीच अनुभवास येतो..अख्खे गाव शिक्षकावर प्रेम करणारा प्रसंग क्वचितच असावा. याचमुळे आज प्रत्येकाने भाषणात गुरुजींचे कौतुक केले. श्री. शिंदे यांनी चौदा वर्ष विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रत्येकाने मनापासून कौतुक केले.
माजी सभापती प्रवीण गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष बबलू जाधव, सरपंच बाजीराव जाधव, उपसरपंच बाळू सावंत, सोपान जगझाप, अविनाश जगझाप, ग्रामसेविका फुलकंठवार, गावडे, कृषी अधिकारी जाधव, परमानंद जाधव, कृष्णा जानराव, रामू आगवण, अरुण जाधव आदी उपस्थित होते. श्री. कुलगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.