Students of overseas medical courses under International Medical Research Exchange at SMBT Hospital. esakal
नाशिक

Nashik : 'SMBT'त वळताय परदेशी विद्यार्थ्यांची पावले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस दिवसांत परदेशातील नऊ विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत रुग्णांवर होणाऱ्या उपचार पद्धतीचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय मेडिकल रिसर्च एक्‍स्‍चेंजअंतर्गत या विद्यार्थ्यांनी एसएमबीटीला पसंती दर्शविली. (Students of overseas medical courses under International Medical Research Exchange at SMBT Hospital Nashik news)

या विद्यार्थ्यांमध्ये ऍडम डूकोविच (स्लोव्हाकिया), अलिसा फर्नांडिज (स्पेन), ज्युलिया कोनाट (पोलंड), मॅरियम अल्बाना (बहारीन), नौर होश्याम इल्वाकील (इजिप्त), मार्ता पेरीज कॅब्रेरा (स्पेन), युरी सिल्वा (ब्राझील), ऍमा (इस्टोनिया) यांचा समावेश होता.

तसेच एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील चार विद्यार्थी फ्रांस, इटली आणि स्पेनमध्ये नुकतेच भेट देऊन आले. यात आर्यमन सिंग आणि अथर्व देवकर हे फ्रांसमध्ये तर स्वराली खेडकर इटलीत आणि जान्हवी पारकर स्पेनमध्ये जून, जुलै महिन्यात जाऊन आले. त्यांनी वेगवेगळ्या देशात रुग्णांवर होणाऱ्या उपचार पद्धतींचा अभ्यास केला.

विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पावर काम करावे लागते. या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या संशोधनाच्या क्षेत्रात ज्ञान वाढविण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठांच्या माध्यमातून राबविला जातो.

एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. श्याम अष्टेकर, डॉ. संजय जाधव, डॉ. नीरज मोरे, डॉ. किरण राजोळे, डॉ.लीना जैन यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. संपूर्ण प्रकल्पाला एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या अधिष्ठाता आणि एमएसएआय-एसएमबीटीच्या सचिव डॉ मीनल मोहगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प समन्वयक डॉ. मानसी पाध्ये-गुर्जर आणि एसएमबीटी-एमएसएआयचे विद्यार्थी प्रतिनिधी जान्हवी साबू, जतिन कुकरेजा, जान्हवी पारकर, जान्हवी वलियपरमबिल आणि अथर्व देवकर यांनी परिश्रम घेतले.

एसएमबीटीत हा प्रकल्प २०२२ मध्ये प्रथमच सुरु झाला. पहिल्याच वर्षी परदेशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशात रिसर्च एक्स्चेंजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले असलेल्‍या दोन संस्‍थांमध्ये एसएमबीटीचा समावेश आहे.

कोट

वीस दिवसांत वैद्यकीय महाविद्यालयामधील दैनंदिन कामकाज पहिले. रुग्णांवर होणारे उपचार, शस्रक्रीयांचा अनुभव घेतला. रुग्णांचे हॉस्पिटलसोबत असलेले नाते, त्यांचा विश्वासाचे महत्त्व शिकायला मिळाले.

- मार्ता पेरिज कॅब्रेरा, स्पेन.

कोट२ः

आम्ही ऑपरेशन थियेटरमध्ये उपस्‍थित असताना महिलेची प्रसूती झाली. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला, त्‍यावेळीचा आनंददायी अनुभव अविस्‍मरणीय आहे. महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद, डॉक्टरांकडून मिळालेली प्रेरणा कायम आठवणीत राहील.

- ऍमा, इस्टोनिया.

Associated Media Ids : NCTY22B10071

Remarks :

कवर पान

Audit History:Date/Time Description ActionBy

8/24/2022 3:36:51 PM Story received from B-NASHIK_CITY arun.malani

8/24/2022 4:13:40 PM Story moved to kprashant

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT