नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी रविवारी (ता. १७) नॅशनल इलिजिब्लीटी कम एन्ट्रान्स टेस्ट (NEET) २०२२ झाली.
नाशिकमधील २० परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या साडेबारा हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे पाच टक्के विद्यार्थी गैरहजर (Absent) होते. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून विद्यार्थी परीक्षेसाठी नाशिकला दाखल झाले होते. (Students take NEET exam 5 percent of students are absent Nashik latest Marathi news)
पालकांची उन्हात परीक्षा
बऱ्याच दिवसांनंतर पावसाने उघडीप दिल्याने रविवारी दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन घडले. विद्यार्थी परीक्षा केंद्रात पेपर सोडवीत असताना, अनेक पालक केंद्राबाहेर ठाण मांडून होते.
अशात तप्त सूर्यकिरणांनी पालकांची चांगलीच परीक्षा घेतली. सावलीचा शोध घेत पालकांनी परीक्षा कालावधीत विश्रांती घेतली. काहींनी चारचाकी वाहनात ठाण मांडला होता.
दरम्यान, परीक्षेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्गात मास्क सक्ती केली होती. एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट-युजी २०२२ परीक्षा घेतली जाते.
रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनिटे, अशा तीन तास २० मिनिटांच्या कालावधीत ७२० गुणांसाठी ही परीक्षा झाली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार दुपारी दीडपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात आला. काही परीक्षा केंद्रांवर निर्धारित वेळेपेक्षा उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या प्रश्नांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने प्रत्येक प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा कस लागला होता.
नाशिकमध्ये २० केंद्रांवर ही परीक्षा झाली. सुमारे साडेबारा हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यापैकी सुमारे पाच टक्के अर्थात साडेसहाशेच्या सुमारास विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. उर्वरित विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे गेले.
नीट परीक्षेतील क्षणचित्रे...
-परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी मास्कची सुविधा
-बायोमॅट्रीक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी
-सॅनिटायझर, पारदर्शक पाणी बाटली बाळगण्यास परवानगी
-विद्यार्थ्यांकडून ड्रेसकोडचे काटेकोर पालन
-ऐनवेळी धावत पळत काही विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश
-नाशिकसह धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यातील विद्यार्थी दाखल
-परीक्षा केंद्रांबाहेर शिकवणीच्या माहितीपत्रकांचा सुळसुळाट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.