Admission Process News esakal
नाशिक

Admission: परफॉर्मिंग आर्टकडे विद्यार्थ्यांचा कल! प्रवेशप्रक्रिया अजूनही सुरू

सकाळ वृत्तसेवा

Admission : बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टमधील अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अभिनयातील करियरसाठी अभ्यासक्रम मार्गदर्शक ठरत आहे. के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट, स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट महाविद्यालयांतील बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट विभागांत विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू आहे.

नाट्यशास्त्राच्या पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. यंदा गत वर्षापेक्षा जास्त प्रवेश झाले आहेत. (Students tend towards performing arts Admission process still going on nashik)

अभिनयक्षेत्रात संधी असल्याने नाट्यशास्त्र विषयाकडे विद्यार्थी वळताना दिसत आहेत. परफॉर्मिंग आर्ट्स येथे नृत्य, नाटक आणि संगीत विषयावर धडे दिले जातात.

चार वर्षांच्या बॅचलर कोर्समध्ये के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट, स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट महाविद्यालयांत प्रत्येकी ७० हून अधिक विद्यार्थी नाट्य, संगीत, नृत्याचे धडे गिरवीत आहे.

अभ्यासक्रमात विविध विषय शिकविले जात असून सेमिस्टरमध्ये पाचशे गुणांची लेखी, तीनशे गुणांची प्रॅक्टिकल परिक्षा होते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील विद्यार्थ्यांनीही नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट महाविद्यालयात तीस जागांसाठी आतापर्यंत नाट्यशास्त्रासाठी सात, संगीतासाठी दहा, नृत्यासाठी पाच असे २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

"बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टमधील अभ्यासक्रमाकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल असून आतापर्यंत २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतले आहेत."

- मकरंद हिंगणे, प्राचार्य, के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट

"स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट महाविद्यालयात २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचा यंदा प्रवेश घेण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे." - प्रा. प्रवीण जाधव, स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT