Officials of Cyclist Foundation along with Akshay Patil of the police force who has been honored with Iron Man esakal
नाशिक

Ironman Success : मालेगाव पोलिस दलातील अजयने मिळवला ‘आयर्न मॅन’चा किताब!

सकाळ वृत्तसेवा

Ironman Success : पोलिस दलातील अक्षय पाटील यांनी कझाकिस्थान येथे आयोजित स्पर्धा वेळेत पूर्ण करून आयर्न मॅन हा बहुमान मिळवला. आयर्न मॅन जगात अतिशय अवघड अशी स्पर्धा मानले जात.

यात चार किलोमीटर स्वीमिंग १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर रनिंग ही निर्धारित वेळेत पूर्ण करायची असते.

मालेगाव पोलिस दलातील अक्षय पाटील याने ही स्पर्धा वेळेत पूर्ण करत आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. या पुरस्काराबद्दल सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. (Success Malegaon Police Force Ajay got title of Iron Man nashik)

अक्षय पाटील यांनी ही स्पर्धा अवघ्या चौदा तास वीस मिनिटात पूर्ण केली. पोलिस खात्यातील आपली जबाबदारी सांभाळून सराव करत त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.

यापूर्वी श्री.पाटील यांनी सायकलिंगमध्ये सुपर रॅनडोर, गोवा येथे हाफ आयर्न मॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे . सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे अध्यक्ष सतीश काकळीज यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सायकलिस्ट फाउंडेशनचे दादाजी मगर, डॉ.सचिन ठाकरे, जयंत मोरे, डॉ.अतुल गिलाणकर, अशोक सूर्यवंशी, डॉ.तुषार शेलार, जयवंत खरे, डॉ.विलास बागड, एकनाथ भदाणे, डॉ.तेजस शेलार, राजेंद्र ठाकरे, डॉ. प्रशांत पाटील, नरेंद्र पाटील, डॉ. प्रल्हाद ठोके, डॉ. अनिल सूर्यवंशी, राजेंद्र महाजन, पुष्पक निकम, पोलिस उपनिरीक्षक श्री. राजपूत, नीलेश सूर्यवंशी, शंकर कदम, दत्तू देवरे, जीवन खैरनार उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"स्पर्धा अतिशय अवघड होती. पण इच्छा आणि जिद्द असली की काही वाटत नाही. पोलिस दलात काम करून हे सर्व करत असताना फार जिकरीचे होते. सर्वांची फार मदत लाभली."

- अक्षय पाटील, आयर्न मॅन

"तरुणांनी व्यायामकडे वळण्याची गरज आहे. तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे." - सतीश काकळीज, अध्यक्ष, सायकलिस्ट फाउंडेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT