Nashik News : परिस्थिती कशीही असो जिद्द आणि आत्मविश्वासावर जग जिंकणेदेखील शक्य होते. याचा प्रत्यय दिला गंजमाळ भीमवाडी येथील आम्रपाली वाकळे तरुणीने. आई धुनी- भांडी आणि वडील घंटागाडीवर कचरा गोळा करण्याचे काम करून उदरनिर्वाह भागवत होते. (success story amrapali wakale became first police from bhimwadi nashik news)
अतिशय हालाखीची परिस्थिती असतानादेखील शिक्षण घेत भीमवाडीतून पहिली महिला पोलिस होण्याचा मान मिळविला. आम्रपालीचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. १ मध्ये झाले. पाचवी ते दहावी रमाबाई कन्या विद्यालयात झाले. तर केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत उच्चशिक्षण घेतले.
अतिशय गजबजलेला आणि मागास भाग असल्याने अभ्यास करताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कधी घरी तर कधी त्र्यंबक सिग्नल येथील वाचनालयात तिने अभ्यास करत प्रत्येक परीक्षेत यशवंत होत राहिली. त्यातच तिने मुंबई पोलिस भरती अर्ज केला. भरतीसाठीही तिने काबाडकष्ट केले.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे या हेतूने सतत अभ्यास करत राहिली. बुधवारी (ता. १७) तिच्या कष्टाचे फळ मिळाले. मुंबई पोलिसांकडून शिपाई पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात आम्रपालीच्या नावाचा समावेश होता. भीमवाडी परिसरात वृत्त पसरताच कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांमध्ये उत्साह निर्माण झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रहिवाशांकडून नागरी सत्कार करण्यात आला. सर्व गोष्टींची सुविधा असतानाही अनेकांना यश संपादन करणे अवगत नसते. आम्रपालीने मात्र काही नसताना सर्वकाही शक्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भीमवाडी परिसर गोरगरीब आणि कष्टकरी नागरिकांचा आहे.
आतापर्यंत कोणीही अशाप्रकारे पोलिस विभागात कार्यरत झालेले नाही. आपल्या कष्टाच्या जोरावर आम्रपालीने पोलिस शिपाई पदावर गगनभरारी घेत गंजमाळ भीमवाडी परिसरातील पहिली महिला पोलिस होण्याचा मान मिळवला आहे.
भद्रकाली पोलिसांची प्रेरणा
आम्रपालीचे कौटुंबिक परिस्थिती हालाखीची होती. पोलिस होण्याची तिची जिद्द लक्षात घेता गंजामाळ पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तिला प्रोत्साहन दिले.
तिला पुस्तके घेणे शक्य नसल्याने पोलिस भरतीसाठी लागणारे पुस्तके आणि मैदानी तयारीसाठी पोलिस परेड मैदान पोलिसांनी उपलब्ध करून दिले. त्यातून केलेली तयारी आणि आई-वडिलांच्या प्रेरणेने शेवटी आम्रपाली पोलिस विभागात दाखल झाली.
"मुलीने आमच्या कष्टाचे सोने केले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तिने शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली. तिच्या मामाची तिला वेळोवेळी मदत मिळत राहिली. आम्हा सर्वांचे नाव तिने अभिमानाने मोठे केले." - वंदना वाकळे, आई
"वस्तीतून पोलिस होण्याचा पहिला मान मिळाला. जिद्द आणि कष्ट हवे यश हमखास मिळते. यापुढेही अधिक कष्ट घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. लोकसेवा आयोगाची तयारी सुरू आहे." - आम्रपाली वाकळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.