नाशिक

Success Story : अडथळ्यांची शर्यत पार करून अंकुश यशस्‍वी! कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सुरू ठेवला अभ्यास..

As soon as the result of the examination was announced, the joy of Nifade family members was cheering and filling the padha.

अरुण मलाणी

Success Story : रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान तरी वाट चालतो... अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही...’ या कवी सुरेश भट यांच्या ओळी शिरवाडे वणी (ता. निफाड) येथील अंकुश यादव निफाडे या युवकाने जगण्यातून कृतीयुक्‍त बनविल्‍या आहेत. आयुष्यात अनेक अडथळे आलेत, पण न डगमगता अंकुशने अखेर स्‍पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.

कुटुंबाचा प्रमुख म्‍हणून जबाबदारी सांभाळताना व वडिलोपार्जित शेती करत अकुंशने स्‍पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता.

(success story ankush niphade get Success in Ministry Clerk and Tax Assistant Examination nashik news)

नुकताच जाहीर झालेल्‍या महाराष्ट्र सेवा गट-क २०२१ परीक्षेत मंत्रालय क्‍लर्क आणि कर सहाय्यक परीक्षेत यशाची पताका फडकविताना संघर्षमयी प्रवासाला विराम दिला आहे. मूळचा शिरवाडे वणी (ता. निफाड) येथील अंकुश निफाडे याचे वडील यादव निफाडे यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्‍यानंतर कुटुंबातील मोठा मुलगा म्‍हणून अंकुशवर संपूर्ण जबाबदारी आली.

आयुष्यात आपण काहीतरी वेगळे करून दाखवायचे, या ध्येयाने पेटलेल्‍या अंकुशने स्‍पर्धा परीक्षाच्‍या तयारीला २०१४ पासून सुरवात केली. नाशिकमध्ये भाभानगर येथील गिते अभ्यासिकेत तासनतास अभ्यास करायचा आणि आवश्‍यकतेनुसार गावाकडील शेतीची संपूर्ण कामे करायची, अशी दिनचर्या अंकुशची होती.

कुटुंबीयांच्‍या खंबीर पाठबळामुळे सत्‍यात उतरले स्‍वप्‍न!

अंकुश इयत्ता नववीत असताना वडिलांचे निधन झाले. याच वर्षी आजी, काकांचेही निधन झाले. त्‍यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्‍याच्‍यावर होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्‍वप्‍न होते, तर दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील होत्‍या. २०२० मध्ये त्‍याचा विवाह प्रा. दीपिका यांच्‍याशी झाला. पत्‍,नी तसेच आई रंजना, भाऊ वैभव यांची जबाबदारी अंकुशवर होती. या वर्षाच्‍या सुरवातीस कन्‍येच्‍या जन्‍माने कुटुंबाचा आनंददायी प्रवास सुरू झाला. आपले सर्व कर्तव्‍य पार पाडत अंकुशने यश मिळविले असले तरी कुटुंबीयांच्या खंबीर पाठबळामुळे खऱ्या अर्थाने स्‍वप्‍न सत्‍यात उतरले आहे.

सोबत संपवली ‘एमपीएससी’

काही दिवसांपूर्वी पोलिस उपनिरीक्षकपदाचा निकाल जाहीर झाला होता. यात प्रशांत ताकाटेसह अन्‍य मित्र परिवाराने बाजी मारली होती. त्‍यातच अंकुशनेही यश संपादन केले. स्‍पर्धा परीक्षेला सोबत सुरवात करताना यशस्‍वी कामगिरीने सोबतच संपविली, अशी भावनिक पोस्‍ट टाकत प्रशांतने आपल्‍या मित्र अंकुशचे अभिनंदन केले.

"शासकीय सेवेत दाखल होण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक अडथळे आले. सय्यमी भूमिका घेताना २० पूर्वपरीक्षा व साधारणतः चार मुख्य परीक्षांचा सामना केला. अखेर प्रयत्‍नांना यश आल्याने कष्टांचे चीज झाल्‍याचे समाधान वाटते. उमेदवारांनी अपयशात न डगमगता प्रयत्‍न सुरू ठेवत यशस्‍वी व्‍हावे." -अंकुश निफाडे, यशस्‍वी उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT