Shital Bhoj esakal
नाशिक

Success Story: पतीच्या मार्गदर्शनाखाली ‘ती’चे वडिलांचे स्वप्न पूर्ण! चांदोरीच्या शीतल भोज यांची महसूल सहाय्यकपदाला गवसणी

‘मुलगी शिकली, तर दोन्ही घरी प्रकाश देते’, ही वडिलांची इच्छा तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पूर्ण केली.

सकाळ वृत्तसेवा

चांदोर : पतीच्या मार्गदर्शनाखाली येथील भूमिकन्येने सहायक महसूलपदाला गवसणी घातली.

‘मुलगी शिकली, तर दोन्ही घरी प्रकाश देते’, ही वडिलांची इच्छा तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पूर्ण केली. (Success Story Chandori Sheetal Bhoj elected post of revenue assistant nashik)

दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. अतिशय मेहनत करून आई रत्ना भोज यांनी मुलगी शीतल आणि भाऊ प्रदीप यांना शिकविले. वडिलांच्या मृत्यूनंतर शितलने स्वतःच्या मनात त्यांची इच्छा पूर्ण करण्याची खूणगाठ बांधली.

आई आणि भाऊ यांनी तिला पूर्णपणे पाठबळ दिले. तीन महिन्यांपूर्वी तिचे लग्न कारसूळ येथील पोलिस उपनिरीक्षक असलेल्या प्रशांत ताकाटे यांच्याशी झाले. पती प्रशांतही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पाेलिस उपनिरीक्षकपदासाठी प्रयत्न करीत होते.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ध्येयाने शीतल यांनी जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात शीतल भोज-ताकाटे यांचे नाव आल्याने चांदोरी व कारसूळ येथे आनंदोत्सव करण्यात आला.

शितलचे प्राथमिक शिक्षण ओणेवाट जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात, तर बारावीनंतरचे शिक्षण नाशिकच्या के.आर.टी. महाविद्यालयात झाले.

"शासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असताना, अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र, जिद्द व आत्मविश्वाच्या बळावर कुठलेही यश अवघड नाही."

-शीतल भोज-ताकाटे, महसूल सहायक

"आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करताना प्रत्येकाने शासकीय सेवेची तयारी करायला हवी. प्रशांत ताकाटे व शीतल भोज यांनी आताच्या तरुणांना हाच संदेश दिला आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी."-सिद्धार्थ वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kothrud Assembly Election : चंद्रकांत पाटीलांचा जीव भांड्यात! बंडखोराने घेतली माघार, पेढा भरवून केलं मनोमिलन

Imperial Blue: भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार; दोन कंपन्या खरेदीच्या शर्यतीत, कोण आहे आघाडीवर?

मेरे करण अर्जुन आएंगे नही, आगये! थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार शाहरुख सलमानचा 'करण-अर्जुन'; वाचा तारीख

तुमको कुछ नहीं पता है! पत्नी साक्षीसमोर MS Dhoniचंही नाही चालत;'कॅप्टन कूल'नं सांगितला भन्नाट किस्सा, Video Viral

Latest Maharashtra News Updates : आमदार चेतन तुपे भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT