Tushar with farmer parents esakal
नाशिक

Success Story : शेतकरी वडिलांची शिक्षणाची स्वप्नपूर्ती करत चांदोरीचा तरुण झाला DRDOत शास्त्रज्ञ!

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात ‘डीआरडीओ’मध्ये येथी तुषार रौंदळ याची निवड झाली आहे.

सागर आहेर

चांदोरी : जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन केवळ आपल्या मेरिटच्या जीवावर शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत शास्त्रज्ञ वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात ‘डीआरडीओ’मध्ये येथी तुषार रौंदळ याची निवड झाली आहे. (Success Story Chandori youth tushar raundal became scientist in DRDO by fulfilling his fathers dream of education)

चांदोरीतच ‘रयत’च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर क. का. वाघ तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल पदविका पूर्ण केली. मेकॅनिकल पदवी ‘मविप्र’च्या अभियांत्रिकी विद्यालयात घेतल्यावर त्याने महानिर्मितीमध्ये नोकरीही मिळविली.

मात्र, शिक्षणाची ओढ शांत बसू देत नसल्याने त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरी करत त्याने अभ्यासाला सुरवात केली आणि डीआरडीओची जाहिरातीनुसार त्याने अर्ज दाखल केला. देशातील दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत असताना तुषारने यश मिळवून सैन्यदलात शास्त्रज्ञ बनला.

तुषार शेतकरी कुटुंबात वाढला. वडील गणपत व आई संगीता दोन एकर शेतीत उपजीविका भागवितात. त्यांचा दुसरा मुलगा रोहित इलेक्ट्रिक व्यवसाय करतो. घरातील पहिला उच्च शिक्षण घेणारा तरुण म्हणून सगळेच कुटुंबीय त्याला शिक्षणाला प्रोत्साहन देत होते.

ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची भीती वाटत असली, तरी त्यांच्याच आत्मविश्वास आणि कष्ट करायची तयारी जास्त असते, असे तुषार सांगतो.

एखाद्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर त्यातच पुढे शिक्षण घेणे चांगले असताना, अनेक तरुण स्पर्धा परीक्षांमागे धावतात. मूळ ज्या विषयात शिक्षण घेतले त्यातच तुम्ही अभ्यास करीत राहिल्यास अनेक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे तुषार सांगतो.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यातच विज्ञानाची आवड असल्याने अभ्यास करीत होतो आणि सैन्यदलातील या संधीला आत्मविश्वासाने समोर गेलो.

देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तीर्ण झालो. आता भारतीय सैन्यदलात कार्यक्रम विकसित करण्याची इच्छा असून, याबाबत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास तुषारने व्यक्त केला.

निवड झाल्यानंतर तुषारच्या अभिनंदनासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. तुषार नेमका काय झाला, हे समजत नसले, तरी तो सैन्यात मोठा साहेब झाल्याची गावकऱ्यांची भावना आहे. सध्या गावभर त्याचे सत्कार सुरू आहेत. तुषारला मिळालेले यश पाहून गावातील इतर मुलांनी प्रेरणा घ्यावी, अशीच ग्रामस्थांची इच्छा आहे.

आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्याच्या वडिलांना शिकायचे होते, पण परिस्थितीने शिकता आले नाही. आता मात्र तुषारच्या रुपाने त्यांना आपणच भारतीय सैन्यात दाखल झाल्याचा आनंद झाला आहे.

इंजिनिअर झाल्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तुषार भारतीय सैन्यात शास्त्रज्ञ बनला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांनी तुषारच्या यशात आपली स्वप्नपूर्ती पहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT