Dnyaneshwar Dudhekar with his mother and father expressing happiness after his success in the Maharashtra Public Service Commission examination esakal
नाशिक

PSI Success Story: शेतकऱ्याचा पोरगा झाला फौजदार! एका मार्काच्या हुलकावणीनंतर जिद्दीने यशाला घातली गवसणी

सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : खडकी (ता. मालेगाव) येथील ज्ञानेश्वर अण्णाजी दुधेकर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदावर मोहोर उमटवली.

घरची परिस्थिती बेताचीच, अल्पशा शेतीवर गुजराण करणारे कुटुंब, वडील निरक्षर, मात्र आई-वडिलांची प्रेरणा व ध्येयाने प्रभावित झालेल्या ज्ञानेश्वरने प्रचंड कष्टातून पोलिस दलात झेंडा रोवला. (Success Story farmer son dnyaneshwar dudhekar became Police sub inspector nashik)

ज्ञानेश्‍वर दुधेकर यांनी खडकीत आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर मालेगाव येथे केबीएच विद्यालयात आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतीगृहात राहून फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून गणित या विषयात २०१७ वर्षी पदवी मिळवली.

पदवीधर झाल्यानंतर ज्ञानेश्वरने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गाठले. विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत अथक परिश्रम, कष्ट, जिद्द व चिकाटी साथीला होती.

बारावीनंतर वडिलांनी सांगितले होते की, आता शिक्षण पूर्ण झाले. शेतीकडे लक्ष दिले पाहिजे परंतु आईचे बारावीपर्यंत शिकलेल्या असल्याने वडिलांची समजूत काढली. शिक्षणाचा हा प्रवास सातत्याने चालू ठेवला.

२०१९ च्या परिक्षेत अवघ्या एका मार्कने यशाला हुलकावणीला दिली. मात्र त्यानंतर जिद्दी व चिकाटीने मात देत ज्ञानेश्‌वरने यशाचा पाठलाग करत अखेर २०२० च्या परीक्षेत फौजदार होत आई- बापाच्या कष्टाचा सुगंध दरवळला.

दरम्यान ज्ञानेश्वरने कष्टाच्या संघर्षात सलग सात विविध पदांसाठी परीक्षाही दिल्या स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले. गावातील फौजदार शेखर बागूल व रोहिणी बागूल या भावंडांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासह सतीश वैद्य यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वेळोवेळी आर्थिकदृष्ट्या मदतीला धावून येणारे मित्र दिलीप शेळके, राहुल कळमकर, बाळासाहेब दुधेकर, सागर चव्हाण यांचे भक्कम पाठबळ मिळाले. ज्ञानेश्वरच्या रूपाने गावाने तिसरा फौजदार दिला. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

"अल्पभूधारक शेतकरी आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच यशापर्यंत पोचू शकलो. जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी पदवीकडेही लक्ष दिले पाहिजे. तसेच आपला प्लॅन बी देखील तयार ठेवावा."

- ज्ञानेश्वर दुधेकर, पोलिस उपनिरीक्षक.

"आम्ही पहिल्या पिढीचे पदवीधारक असून माध्यमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण सोबत वसतिगृहातच घेतलेले आहे. ज्ञानेश्वरच्या संघर्षाला यश मिळाले. या ध्येयाचा माळमाथा परिसरातील तरुण नक्कीच प्रेरणा घेऊन आदर्श निर्माण करतील."

- सतीश वैद्य, पदव्युत्तर युवक, खडकी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT