Success Story : कष्ट, मेहनत व जिद्द असेल तर कुठलेही यश मुठीत घेता येते. वस्तीशाळेत शिक्षण घतेलेल्या व सर्वसामान्य शेतकरी पुत्र असूनही कष्टाने देवानंद वाडी (अंदरसुल) येथील गौरव दत्तात्रय देवरे याने इंडियन बँकिंग सर्व्हिस परीक्षेंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर या बँकिंग सर्व्हिस परीक्षेत यश संपादन करून असिस्टंट मॅनेजर पदाला गवसनी घातली आहे. (Success Story Gaurav devre studied in residential school scored an eagle in banking exam nashik news)
गौरव हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून, त्याने इयत्ता चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण देवानंद वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या वस्ती शाळेत घेतले. पुढे येवल्यात आत्याकडे राहून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला मात्र, परिस्थिती बेताची असल्याने कोपरगाव येथील इंजिनियरिंग कॉलेजला पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तीन वर्षाची पदविका चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पदवी परीक्षेसाठी अशा पल्लवीत झाल्या.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इंजीनियरिंग कॉलेज, पुणे येथे प्रवेश मिळाला आणि भविष्याची बीजे तेथेच रुजली गेली. आजूबाजूला अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेबाबत चर्चा करायचे. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून चांगले यश संपादन केल्याचे पाहायला मिळाले. पदवीनंतर आपणही नशीब आजमावून पाहू, या उद्देशाने तो अभ्यासाला लागला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पुणे येथे शिकत असताना गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने खर्चाला हातभार लागला अन् त्याने परिस्थितीची जाणीव ठेऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास मन लावून केला. चांगल्या गुणांनी बीई इलेक्ट्रिकल उत्तीर्ण होऊन स्वप्नपूर्तीकडे वाटचाल केली.
दीड वर्ष अभ्यास करताना व्हाटसअप, फेसबुक या सर्व गोष्टींकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे आपले उद्दिष्ट साध्य करून हे यश त्याला संपादन करता आले आहे. त्याच्या या यशाबद्दल देवानंद वाडी शाळेच्या शिक्षकांना अभिमान वाटतो.
शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. गावातील मित्र व नातेवाईक, परिवाराने गौरवचे अभिनंदन केले आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, जयराम नळे, माधव पिंगळे यांनीही त्याचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.