Vaibhav Aher esakal
नाशिक

Success Story : दिव्यांग वैभव आहेरची गगनभरारी; पंजाब नॅशनल बँकेत सहाय्यक व्यवस्थापकपदी निवड

सकाळ वृत्तसेवा

धुळगाव (जि. नाशिक) : येथील दिव्यांग वैभव आहेर यांची नुकतीच पंजाब नॅशनल बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकपदी निवड झाल्याने वैभवने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, त्याच्या यशाबद्दल तालुक्याचे ज्येष्ठ नेते मारोतराव पवार यांनी वैभवचे अभिनंदन केले. (Success Story of disabled Vaibhav Aher Selection as Assistant Manager in Punjab National Bank nashik news)

वैभवचे प्राथमिक शिक्षण धुळगावातच झाले. खरेतर जन्मत:च वैभवला फार कमी दृष्टी होती. प्राथमिक शाळेत असतानाच त्याला योग्य दिशा मिळाली. मीना शेवाळे, प्रकाश अहिरे यांनी वैभवला मार्गदर्शन केले. मात्र, धुळगाव गावात शिकून चालणार नाही असे मत शेतकरी संघटनेचे नेते मोहन गुंजाळ यांचे होते.

सहावीनंतर नाशिकच्या अंधशाळेत टाकण्यात आले. मेहता हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम महाविद्यालयामध्ये झाले. पुढील शिक्षण एचपीटी महाविद्यालयात घेतले. अशातच कोरोनात त्यांचे वडील दत्तात्रय आहेर यांचे निधन झाले.

मात्र, वडील वैभवला नेहमी सांगायचे मी राजकारणातून जो बदल लोकांमध्ये घडवून आणतो तोच बदल तू प्रशासनात जाऊन घडून आणू शकतो त्यामुळे तू प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजे. वडील गेल्यानंतर काही दिवसातच वैभवची आयडीबीआय बँकेमध्ये निवड झाली. नाशिकमधील पाथर्डी फाटा शाखेत नियुक्ती झाली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

वैभवने यावरच न थांबता पंजाब नॅशनल बॅंकेत सहाय्यक व्यवस्थापकपदासाठी अर्ज करून मुलाखत दिली. त्यात वैभवची निवड झाली. त्याला अनेक तृप्ती अग्रवाल यांच्यासह अनेक सहकार्यांनी मार्गदर्शन केले. धुळगावचे सरपंच रामदास इंगळे, राजेंद्र गायकवाड, माजी सरपंच योगेश गायकवाड आदींसह गावातील ग्रामस्थांनी वैभवचा सत्कार केला.

"मला पंजाब नॅशनल बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पद मिळाल्याने आनंदी आहे. यात अनेकांनी मला मार्गदर्शन केले असून त्यांचा मी ऋणी आहे. सर्वांनी शुभेच्छा दिल्या याचा मी नेहमीच कृतज्ञ राहील." - वैभव आहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT